Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केस कापल्यानंतर 80 हजाराच्या मांजरीचा मृत्यू, महिलेने पोस्ट मॉर्टमनंतर केस दाखल केला

Webdunia
फाइल फोटो
मध्यप्रदेशात महिलेने 80 हजार किमतीच्या मांजरीचा मृत्यू झाल्यामुळे एका पार्लर संचालकाविरुद्ध प्रकरण दाखल केले आहे. इंदूर येथे काजल नावाची महिला आपल्या मांजरीचे केस कापवण्यासाठी पार्लर गेली होती. घरी आल्यावर मांजरीचा मृत्यू झाला. महिलेने मांजरीचा पोस्ट मॉर्टम करवले तर फुफ्फुसात पाणी शिरल्यामुळे मृत्यू झाल्याचे आढळून आले. पोस्ट मॉर्टमनंतर महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
 
महिलेने तक्रारीत म्हटले की ती राजस्थान येथील रहिवासी आहे आणि इंदूरच्या एका आयटी कंपनीत काम करते. तीन वर्षांपूर्वी तिने बेंगलुरूहून 80 हजार रुपयात मांजर खरेदी केला होता. ती त्यावर लाखो रुपये खर्च करून चुकली होती. एक वर्षापूर्वींच तिची ट्रांसफर इंदूर येथे झाली होती. मागील महिन्यात ती एका स्क्रब पार्लरमध्ये मांजरीला ग्रूमिंगसाठी घेऊन गेली होती. पार्लर संचालक मधुने तिला हेअर कट करवण्याचा सल्ला दिला. 
 
काजलप्रमाणे तेथील कर्मचार्‍यांद्वारे चुकीच्या पद्धतीने मांजरीच्या तोंडावर पाणी घालत अंघोळ घालण्यात आली. तिने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तर तिला बाहेर पाठवण्यात आले. इकडे पार्लर ऑपरेटरनुसार महिला खोटे आरोप करत आहे. तरी काजल राठौरने आपल्या मांजर जॉयनच्या मृत्यू प्रकरणात पशू पार्लर ऑपरेटरविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments