Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Cockroach in Bread Pakoda एयरपोर्टवर 200 रुपयांच्या ब्रेड पकोड्यात झुरळ, प्रवाशाने शअेर केला अनुभव

Webdunia
गुरूवार, 12 डिसेंबर 2024 (11:37 IST)
Cockroach in Bread Pakoda जर तुम्ही चहासोबत स्नॅक्स खात असाल आणि अचानक त्यातून झुरळ बाहेर आला तर काय स्थिती होईल याचा विचार केला तरी किळस येते. मात्र असाच काहीसा प्रकार जयपूर विमानतळावर एका व्यक्तीसोबत घडला. असं असलं तरी विमानतळावर मिळणाऱ्या वस्तूंच्या किमती गगनाला भिडतात, त्यावरुन त्या खाद्यपदार्थात झुरळ शिरणे म्हणजे निष्काळजीपणाचा कळसच म्हणावा. डीपी गुर्जर नावाच्या व्यक्तीने आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. खाद्यपदार्थांमध्ये अशा घृणास्पद गोष्टी सापडण्याची ही पहिलीच वेळ नसली तरी यापूर्वीही अनेकदा असे प्रकार घडले आहेत.
 
जयपूर विमानतळावर डीपी गुर्जर नावाच्या व्यक्तीने चहासोबत खाण्यासाठी नाश्ता म्हणून ब्रेड पकोडा ऑर्डर केला. तो खाल्ल्याबरोबर पहिल्या चावल्यानंतर त्यातून एक छोटासा मेलेला झुरळ बाहेर आला. ते पाहताच ते घाबरले आणि दुकानदाराकडे याबाबत तक्रार केली.
 
एयरपोर्टवर जिथे सर्व काही स्टैंडर्डच मिळत असेल अशी कल्पना असते कारण तेथे साधारण 20 रुपयांचे पदार्थ 200 रुपयांना सहज विकले जाता. अशात क्वालिटीची अपेक्षा करणे चुकीचे तर नाही पण असे असूनही खाद्यपदार्थांतून मेलेले किडे बाहेर पडणे म्हणजे आरोग्याशी खेळणेच झाले. आता डीपी गुर्जरने शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

श्री गुरु दत्तात्रेय आणि इतर आध्यात्मिक अवतारांना आवडणारे पदार्थ

दत्त जयंती विशेष रेसिपी : दत्तगुरूंना आवडणारी घेवड्याची भाजी

काही लोकांना जास्त थंडी का वाजते? कारण जाणून घ्या

दत्तमाला कर्णांकित माघ माहात्म्य

मानवाने पहिल्यांदा कपडे कधी आणि का घालायला सुरुवात केली?

सर्व पहा

नवीन

Pension for gig workers डिलिव्हरी बॉईज आणि कॅब ड्रायव्हरसाठी चांगली बातमी! पेन्शन देण्याचे सरकारचे नियोजन

महाराष्ट्रात महायुतीचा मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला,14 डिसेंबरपर्यंत मंत्रिमंडळ विस्ताराची संभावना

LIVE: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या बैठकीत फॉर्म्युला ठरला

भरधाव वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या लोकांना चिरडले, 3 जणांचा मृत्यू

नागपूरमध्ये हवाई दलाच्या जवानाने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या

पुढील लेख
Show comments