Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Deliver Food On Wheelchair:व्हीलचेअरवर फूड डिलिव्हर करणार्‍या व्यक्तीचा व्हिडिओ झाला व्हायरल !

Webdunia
शुक्रवार, 29 जुलै 2022 (12:32 IST)
Photo- InstagramZomato Boy Deliver Food On Wheelchair: सोशल मीडियावर अनेक वेळा असे व्हिडीओ व्हायरल होतात जे भावुक करणारे असतात. असाच  एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये व्हीलचेअरवर बसलेला एक माणूस झोमॅटो फूड डिलिव्हरीसाठी जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून युजर्स खूप भावूक होत आहेत.आणि या व्यक्तीच्या कामगिरीला सलाम करत आहेत. त्याचबरोबर झोमॅटोनेही या व्यक्तीला नोकरी दिल्याबद्दल त्याचे कौतुक केले जात आहे. काहीही असो, हा माणूस ज्या प्रकारे आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे ते कौतुकाचे पात्र आहे. तसेच छोट्या छोट्या समस्यांना हार मानणाऱ्यांसाठी ही प्रेरणा आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Grooming bulls (@groming_bulls_)

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती व्हीलचेअरवर जात असल्याचे दिसत आहे. ही मोटारसायकलसारखी व्हीलचेअर आहे जी कदाचित इंजिनद्वारे चालविली जाते. त्या व्यक्तीने झोमॅटोचा टी-शर्ट घातला आहे आणि व्हीलचेअरच्या मागे झोमॅटोचा बॉक्सही ठेवला आहे. हे मार्केटचे ठिकाण दिसत असून मागून कोणीतरी त्या व्यक्तीचा व्हिडिओ बनवला आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीचा चेहरा दिसत नाही. तो व्हीलचेअरवर रस्त्यावरून चालताना दिसत आहे.
 
हा व्हिडीओ कुठचा आणि कधीचा आहे हे कळू शकलेले नाही. इंस्टाग्रामवर groming_bulls_ या नावाने शेअर केले आहे. यावर कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'प्रेरणेसाठी सर्वोत्तम उदाहरण.' हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. तो आतापर्यंत 11 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याच वेळी, व्हिडिओला 1.4 लाखांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स भावूक होत आहेत आणि त्यावर आपली प्रतिक्रियाही देत ​​आहेत.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र व्याघ्र प्रकल्पात मोबाईल फोनवर बंदी, वाघिणीचा मार्ग अडवल्याच्या घटनेनंतर वन विभाग सक्रिय

LIVE: एचएमपीव्ही विषाणू हा चिंतेचा विषय नाही-आरोग्यमंत्री प्रकाश अबितकर

तिरुपती मंदिरात अचानक चेंगराचेंगरी, 6 भाविकांचा मृत्यू तर 30 हून अधिक भाविक जखमी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त यांना तिसऱ्या अपत्याची माहिती लपवल्याबद्दल सेवेतून काढले

एचएमपीव्ही विषाणू हा चिंतेचा विषय नाही, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आबितकर यांनी जनतेला आश्वासन दिले

पुढील लेख
Show comments