Dharma Sangrah

चक्क शेतात सापडला हिरा!

Webdunia
गुरूवार, 20 सप्टेंबर 2018 (00:16 IST)
मध्यप्रदेशातील पन्ना हे ठिकाण जुन्या काळापासूनच हिर्‍यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. पन्ना जिल्ह्यातील एकाशेतकर्‍याला आपल्या शेतात 12 कॅरेट 58 सेंटचा हिरा सापडला आहे. त्याची अंदाजे किंमत 30 लाख रुपये आहे. या हिर्‍याच्या लिलावानंतर आता हा गरीब शेतकरी लक्षाधीश बनेल. जिल्हा खनिज व हिरा अधिकारी संतोष सिंह यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, प्रकाश कुमार शर्मा नावाच्या शेतकर्‍याला सरकोहा गावातील आपल्या शेतात हा हिरा सापडला. त्याची खरी किंमत किती आहे हे लिलावानंतरच स्पष्ट होईल. या शेतकर्‌याने हा हिरा जिल्ह्याच्या हिरा कार्यालयात जमा  केला. आता या हिर्‍याला लिलावात ठेवण्यात येणार आहे. तिथे दर तीन महिन्यांनी हिर्‍यांचा लिलाव केला जातो. या हिर्‍याचा लिलाव झाल्यावर 12 टक्के रॉयल्टी आणि अन्य कर कापून जे पैसे येतील ते सर्व या शेतकर्‍याला मिळतील. विशेष म्हणजे ज्या शेतात हा हिरा सापडला ते शेत केदारनाथ रैकवार नावाच्या शेतकर्‌याचे असून प्रकाश कुमारने ते रितसर भाड्याने घेतलेले आहे!

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जानेवारीत मिळणार नाहीत

महाराष्ट्रातील निवडणूक प्रचार आज संध्याकाळी 5 वाजता थांबणार, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली

राज्यातील सर्व शाळा 5 दिवस बंद, सार्वजनिक सुट्टी जाहीर

LIVE: लाडकी बहीण योजनेवर निवडणूक आयोगाचा हस्तक्षेप

निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे भाजपसोबत राहिले असते तर त्यांना त्यांचे निवडणूक चिन्ह गमवावे लागले नसते रामदास आठवले यांचा दावा

पुढील लेख
Show comments