Festival Posters

आंध्रात सुरू आहे हिर्‍यांचा शोध

Webdunia
पावसाला सुरवात होऊन थोडा काळ गेला की, आंध्रातील कर्नुल आणि अनंतपूर जिल्ह्यात रोजगार सोडून लोक शेते, जमिनी धुंडाळायला सुरवात करतात असे दिसून येईल कारण या दिवसात या भागात हिरे शोधण्याचे काम जोरात चालते. 
 
या भागाला हिर्‍याची जमीन असेच म्हटले जाते. हा भाग हिर्‍यांसाठी प्रसिद्ध असून येथील जमिनीत खूप मोठ्या प्रमाणावर खनिजे आहेत. भूगर्भ विभागातील अधिकारी सांगतात, फार पूर्वी कृष्णदेवराय याच्या काळात तसेच ब्रिटिश काळात येथे हिरे मिळविण्यासाठी खोदकाम झाल्याचे पुरावे आहेत. पावसाला सुरवात झाली की, जनिमीचा वरचा थर वाहून जातो आणि अनेकदा पृथ्वीच्या आतील थरात असलेले दगड वर येतात त्यात अनेकदा हिरे असतात. येथील लोक तसेच आसपासच्या राज्यातले लोकही या काळात येथे हिरे शोधण्यासाठी येतात. त्याच्याकडे कोणतेही आधुनिक तंत्रज्ञान नाही. सूर्य अथवा चंद्र प्रकाशात जेथे जनिमीवर जास्त चमक दिसेल तेथे हे खडे शोधले जातात. अर्थात असा एखादा मौल्यवान खडा मिळणे हा नशिबाचा भाग असतो तरी आशेने लोक येथे शोध घेत राहतात. एखाद्याला असा खडा मिळाला तर तो दलालांना दिला जातो ते त्यबदली काही पैसेसंबंधित माणसाला मजुरी म्हणून देतात असे समजते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

नेदरलँड्सचे महापौर नागपूरच्या रस्त्यांवर त्यांच्या आईचा शोध घेत आहे; ४१ वर्षांपूर्वी या घटनेने केले होते वेगळे

भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई, सागरी हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी बोटीला ताब्यात घेत ९ क्रू मेंबर्सना अटक

LIVE: 'निवडणुकीची शाई सॅनिटायझरने पुसली जात आहे', कुटुंबासह मतदान केल्यानंतर राज ठाकरे यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये ५२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले

धुळे येथे महापालिका निवडणुकीदरम्यान हिंसाचार, शिवसेना नेत्याच्या घरावर हल्ला

पुढील लेख
Show comments