Festival Posters

नामशेष होऊ शकते व्हेलची खास प्रजात

Webdunia
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018 (00:59 IST)
समुद्रात सातत्याने वाढत असलेल्या रासायनिक प्रदूषणामुळे आगामी काही दशकांमध्ये अनेक समुद्री जीवांवर नामशेष होण्याचे संकट ओढावत आहे. त्यामध्ये किलर व्हेलचाही समावेश आहे. पाण्यातील पॉलीक्लोरीनेटेड बायफिनाइल्स (पीसीबी)सारखी हानिकारक रसायने त्यासाठी सर्वात मोठा धोका आहे. चार दशकांपूर्वी या रसायनाला प्रतिबंधित करण्यात आले होते. मात्र अजूनही खाद्य शृंखलेच्या प्रथम  जीवांसाठी त्याचा धोका कायम आहे. डेनमार्कमधील आरहूस विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी जगभरातील 350 किलर व्हेलच्या शरीरातील पॉलीक्लोरीनेटेड बाय‍फिनाइल्स पातळीचे अध्ययन केले. त्यात 50 टक्कयांपेक्षा जास्त पीसीबीमुळे मोठ्या प्रमाणावर प्रभावित आढळू आले. त्याच्या एक किलो फॅटी टिश्यूमध्ये (उती) सुमारे 1300 मिलीग्रॅम पीसीबी आढळून आले. दुसरीकडे अवघे 50 मिलीग्रॅम पीसीबी प्राण्यांच प्रजनन आणि प्रतिरोधन क्षमतेला हानी पोहोचवू शकते. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, ब्राझिल, ब्रिटन आणि जिब्राल्टर खाडीच्या आसपासच्या जलस्रोतामधील व्हेलवर विलुप्त होण्याचे सर्वात मोठे संकट आहे. ब्रिटिश बेटांमध्ये केवळ दहा किलर व्हेलच उरले आहेत. छोट्या माशांच्या तुलनेत शार्क आणि सीलसारखे मोठे समुद्री खाणार्‍या किलर व्हेलमध्ये पीसीबी जास्त प्रमाणात आढळून आले. साहजिकच त्यांची विलुप्त होण्याची श्क्यता सर्वाधिक आहे. डीडीटी व अन्य कीटकनाशकांसोबतच पीसीबीमुळेही महासागर मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

सुनेत्रा पवारांनी आपली धमक दाखवली: प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याबाबत निवडणूक आयोगाला पत्र

लज्जास्पद : डोंबिवलीतील पुजाऱ्याकडून ५ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

LIVE: महाराष्ट्रात फसवणूक करणाऱ्या बाबांची १५०० हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली

२५० कोटी घेऊनही मेस्सीची केरळला पाठ; अर्जेंटिनावर 'फसवणुकी'चा आरोप, कायदेशीर कारवाईची तयारी!

पाकिस्तानमध्ये महागाईचा भडका! पेट्रोल ४५८, तर डिझेल ५०० पार; महागाईने सर्व विक्रम मोडल्याने जनता हवालदिल

पुढील लेख
Show comments