Dharma Sangrah

आयआरसीटीसी एसबीआय कार्डतून फ्री ट्रेन तिकीट ऑफर

Webdunia
शुक्रवार, 18 मे 2018 (08:49 IST)

'इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड' ने (आयआरसीटीसी) एसबीआय कार्डच्या माध्यमातून फ्री ट्रेन तिकीटाची ऑफर उपलब्ध करुन दिली आहे.  फ्री ट्रेन तिकीटाची ऑफर केवळ IRCTC एसबीआय प्लॅटिनम कार्ड (IRCTC SBI Platinum Card) वापरणाऱ्या ग्राहकांसाठी आहे. याची माहिती आयआरसीटीसीतर्फे आपल्या ट्विटर हँडलवरुन देण्यात आली आहे. आयआरसीटीसी एसबीआय प्लॅटिनम कार्डमध्ये ३५० रिवॉर्ड पॉईंट्स, १.८ टक्के ट्रान्झॅक्शन चार्ज वेवर, २.५ टक्के फ्युअल सरचार्ज वेवर आणि रेल्वे तिकीटावर १० टक्के व्हॅल्यू बॅक ऑफर देण्यात येत आहे. 

जर IRCTC एसबीआय प्लॅटिनम कार्डच्या माध्यमातून www.irctc.co.in वरुन तिकीट काढाल. तर  १.८ टक्के ट्रान्झॅक्शन चार्ज देण्यापासून सूट मिळणार आहे. यासाठी  तिकीट बुकींग करताना ट्रान्झॅक्शन चार्ज द्यावं लागणार आहे. मात्र, त्यानंतर ही रक्कम वेव ऑफ होऊन  क्रेडिट कार्डच्या खात्यात जमा होणार आहे. IRCTC SBI Platinum Card वरुन शॉपिंग, रेस्टॉरंटमध्ये जेवण किंवा इतर खर्च केल्यास तुम्हाला रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात. कार्डच्या माध्यमातून १२ रुपये खर्च केल्यास ग्राहकांना एक रिवॉर्ड पॉईंट मिळतो. अशा प्रकारे मिळवलेले रिवॉर्ड पॉईंट्स एकत्र करुन तुम्ही irctc.co.in वरुन तिकीट बूक करुन ते मिळवू करु शकता. ज्यावेळी  तिकीटाची रक्कम आणि रिवॉर्ड पॉईंट्सची वॅल्यू बरोबर होईल त्यावेळी तुम्ही रिडीम करु शकता.

IRCTC SBI Platinum Card वरुन पेट्रोल-डिझेल खरेदी केल्यास २.५ टक्के ट्रान्झॅक्शन चार्ज पासून तुम्हाला सूटका मिळणार आहे. ही सुविधात सर्व पेट्रोल पंपांवर ५०० रुपयांपासून ३००० रुपयांपर्यंतच्या खरेदीवर उपलब्ध आहे. म्हणजेच जर तुम्ही कार्डच्या माध्यमातून ५०० रुपयांचं पेट्रोल खरेदी केलं तर  २.५ टक्के म्हणेजच १२.५ रुपये ट्रान्झॅक्शन चार्ज द्यावा लागणार.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

मुंबई आणि पुण्यातील भाविकांना महाकालेश्वर आणि उत्तर भारतातील दर्शन घेण्याची सुवर्ण संधी

सहकारी संस्थांमध्ये विशेष लेखापरीक्षण अहवाल तयार करण्याचे निर्देश अंतिम आदेश नाहीत- मुंबई उच्च न्यायालय

LIVE: इराण हल्ल्यानंतर जालनाचे खासदार कल्याण काळे दुबईत अडकले

८८ अयातुल्ला खमेनी अजूनही जिवंत आहेत, ही लढाई दीर्घकाळ चालेल

LIVE: छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या ११ नगरसेवक आणि कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments