Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

’हाई झुमका वाली पोर’ तुफान हिट वाचूया या मराठी अहिराणी गाण्या विषयी पूर्ण माहिती

Webdunia
शनिवार, 13 मे 2023 (14:55 IST)
R S
लग्न किंवा सार्वजनिक ठिकाणी अनेकदा युवक हिंदी गाण्यांना पसंद करतात मात्र उत्तर महाराष्ट्रात सध्या ‘हाई झुमका वाली पोर’ गाण्याने धूम केली आहे.  विवाहसोहळाची धामधूम जोरात सुरू आहे. कडाक्याच्या उन्हातही वरातीत नाचण्याला पसंती आहे. कडक उन्हात देखील एक ते दोन तास वराची मिरवणूक निघत आहेत.मिरवणुकीत वेगवेगळ्या गाण्याना पसंती असली यंदाच्या विवाहसोहळ्यांमध्ये ‘हाई झुमका वाली पोर’ या गाण्याला सर्वाधिक पसंती मिळाली आहे.जागोजागी वरातीत हेच गाणे सर्वाधिक वाजविले जात असून वराच्या मित्र मंडळींसह वधू पक्षाकडील तरुणीही या गाण्यावर ठेका धरत आहेत.
 
अहिराणी भाषेतील हे गाणं सध्या सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रेन्ड होतं आहे. इन्स्टाग्राम रिल्स असो की युट्युब, फेसबुक, व्हाट्सअॅप स्टेटस यावर हेच गाणं ट्रेंड होत आहे. युट्युबवर तब्बल 20 मिलियनचाही टप्पा या गाण्यानं पार केला आहे.
 
या गाण्याचे साउंड रेकॉर्डिंग मास्टर समीर केएस यांनी केलं आहे. ‘हाई झुमका वाली पोर’, ना चक्कर मा पोरं व्हयनात वेडा थोडं’ या गाण्यावर विनोद कुमावत आणि राणी कुमावत यांनी ताल धरला आहे. युट्युबवर अहिराणी भाषेतील या गाण्यानी आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे.
 
सध्याच्या घडीतलं सर्वात प्रसिद्ध अहिराणी गाणं – हाई झुमका वाली पोर
अहिराणी गाण्यांमध्ये सध्या लोकप्रिय आणि प्रसिद्ध झालेल्या गाण्यांमध्ये ‘हाई झुमका वाली पोर’ या गाण्याने खूप भाव खाललाय. खान्देशात वाढदिवसाचा कार्यक्रम असो, लग्न असो किंवा हळदीचा कार्यक्रम असो, कोणताही कार्यक्रम असो, हे गाणं नाही वाजलं तर त्या कार्यक्रमात मजाच नाही. विशेष म्हणजे फक्त अहिराणीच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशात या गाण्याचे चाहते आहेत. त्यामुळे अवघ्या महिन्याभरात लाखो प्रेक्षकांनी यूट्यूबवर हे गाणं पाहिलं आहे.
 
‘हाई झुमका वाली पोर’ हे गाणं विनोद कुमावत आणि गायक भैय्या मोरे या दोन तरुणांनी लिहिलंय. तसेच त्यांनीच हे गाणं तयार केलंय. या गाण्यात डान्स करणारा तरुण विनोद कुमावत आहे आणि हे गाणं भैय्या मोरे या तरुणाने गायलंय. भैय्या मोरेला हे गाणं गाण्यासाठी अंजना बर्लेकर या महिला गायिकेने साथ दिलीय. तर राणी कुमावत ही अभिनेत्री या गाण्यात विनोद कुमावत सोबत नृत्य करताना दिसत आहे.
 
या गाण्याने यूट्यूबवर प्रदर्शित झाल्यापासून आतापर्यंतच्या अवघ्या दोन महिन्यात तब्बल 30 मिलियन व्ह्यूज मिळवले आहेत. 1 मिलियन म्हणजे 10 लाख व्ह्यू होतात, याचाच अर्थ 60 मिलियन म्हणजे तब्बल 6 कोटी प्रेक्षकांनी अवघ्या दोन महिन्यात हे गाणं पाहिलं आणि ऐकलं आहे.
 
आता आपण गाण्याच्या बोलकडे येऊयात. आम्ही तुम्हाला या गाण्याचे बोल आणि त्याचा अर्थ थोडक्यात सांगणार आहोत.
 
अहिराणी भाषेतील गाण्याचे बोल:
हाई झुमका वाली पोर हाई नदी थडी ले चालनी
नदी थडी ले चालनी हाई नदी थडी ले चालनी
मना राघ्या वाघ्या नी जोडी पाणी प्यावाले ती थडी चालनी
हाई झुमका वाली पोर हाई नदी थडी ले चालनी
तीना नजरना तो असा घावस मला वाटाय तो मना डाव स
आशी दखी दखी करू नको घायल थोडी नजर दे तुना प्यारणी
हाई झुमका वाली पोर…
 
उनपडे तुना साडीवर पोर ऐशी का मना गाडी वर
अशी टकमक काय मानमान मखडाई राहिणी
हाई झुमका वाली पोर..
 
मस्तानी मन नाव स तूच मना बाजीराव स
तुना सांगे मी येसु साजन माले करिले तू मनी साजणी
हाई झुमका वाली पोर…
 
गाण्याचा मराठीत अर्थ
ही झुमकावाली पोर
नदी तिरावरी चालली
माझ्या राघ्या-वाघ्याची जोडी (बैलजोडी)
पाणी प्यायला नदी तिरावर चालली
 
असं पाहून तू मला घायाळ करु नकोस
थोडी नजर दे तुझ्या प्रेमाची
ही झुमका वाली पोर…..
 
ऊन पडे तुझ्या साडीवर, पोरी येशील का माझ्या गाडीवर
अशी टकमक पाहून मनातल्या मनात काय लाजतेय
ही झुमका वाली पोर…..
 
मस्तानी माझं नाव आहे, तूच माझा बाजीराव आहे
तुझ्यासोबत येईन मी साजन, तू कर मला तुझी साजनी
ही झुमका वाली पोर…..
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अनेक महिने खराब होणार नाही मिठाई, या सोप्या टिप्स अवलंबवा

Healthcare Tips : दिवाळीच्या काळात दमा रुग्णांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी टिप्स

आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर दिवाळीत हे नक्की खरेदी करा

दिवाळीचे साप्ताहिक राशिभविष्य, जाणून घ्या या आठवड्यात कोणत्या राशींवर देवी लक्ष्मीची कृपा असेल 28 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2024

दिवाळीत या जीवांना पाहणे शुभ मानले जाते, जाणून घ्या काय महत्त्व

सर्व पहा

नवीन

मी कधीही महिलेचा अपमान केला नाही राजकीय कारणावरून वाद निर्माण केला गेला, अरविंद सावंतांनी मागितली माफी

भारतीय लष्कराचे मोठे यश, अनंतनागमध्ये 2 विदेशी दहशतवादी ठार

विचारधारेच्या विरोधात गेले....एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

धक्कादायक : नातवाने केला वृद्ध आजीवर लैंगिक अत्याचार

मलिककार्जुन खरगे यांच्या वक्तव्याला एकनाथ शिंदे यांचे प्रत्युत्तर

पुढील लेख
Show comments