Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धवनला रिप्लाय करत सोनू सूदने जिंकली चाहत्यांची मने

Webdunia
शुक्रवार, 29 मे 2020 (11:32 IST)
लॉकडाउनमुळे परराज्यातून आलेले मजूर त्यांच्या गावी जाण्यासाठी धडपड करत आहेत. सरकारकडूनही त्यांच्यासाठी विशेष गाड्यांची सोय करण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकारसोबतच अभिनेता सोनू सूद देखील या मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी प्रयत्नशील आहे. सोनूने अनेक मजुरांना त्यांच्या गावी पाठविणसाठी विशेष बसची व्यवस्था केली असून अनेकांच्या जेवणाचीही सोय केली आहे. या मदत कार्यासाठी त्याने त्यांच्या मालकीची संपूर्ण हॉटेल्सही मजुरांसाठी उपलब्ध करून दिली आहेत.

सोनूचे मदतकार्यपाहून सामान्य जनतेसोबतच कला, सांस्कृतिक आणि क्रीडा विश्वातील सेलिब्रिटींनी त्याचे कौतुक केले. भारताचा डावखुरा सलामीवीर ‘गब्बर' शिखर धवन यानेही सोनू सूदला टि्वटरच्यामाध्यमातून सलाम केला.

विविध ठिकाणी अडकून पडलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी आणि घरापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करणार्यां सोनू सुदच्या प्रयत्नांना आणि मदतकार्याला सलाम! असे टि्वट धवनने केले. त्यावर सोनू सूदने दिलेल्या रिप्लायने त्याने चाहत्यांची मने जिंकली. धन्यवाद भावा! भारताला माहिती आहे की जोवरशिखर धवन क्रीजवर आहे, तोपर्यंत विजय आपलाच आहे. त्याचप्रमाणे मीदेखील वचन देतो की मी स्वतः शेवटपर्यंत क्रीजमध्ये (मदतकार्यात) राहीन. स्थलांतरित मजूर घरी सुखरूप पोहोचेल याची काळजी घेईन, असा झकास रिप्लाय सोनू सूदने दिला.

गेल्या काही दिवसांपासून सोनू लॉकडाउनुळे अडकलेल्यांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचे काम निःस्वार्थपणे करत आहे. तो स्वतः त्यांच्या संपर्कात असून त्यांच्यासाठी बसेसची व्यवस्था करत आहे. आतापर्यंत त्याने अनेक मजुरांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवले आहे. त्याच्या या कार्याचे सर्वच स्तरातून खूप कौतुक होत आहे. Thank u so much my brother.❣️India knows when @SDhawan25 is at cease “WE ARE HOME”. I promise, I will stay at this crease till the end and make sure that every migrant will say “ WE ARE HOME “ ❤️ https://t.co/WhRNkjg7cb

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

सर्व पहा

नवीन

LIVE: अमित शहांचा बचाव करीत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वोट जिहादचा दावा करणाऱ्यांवर सपा आमदार रईस शेख यांनी निशाणा साधला

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उतरले अमित शहांच्या बचावासाठी, म्हणाले ते हे करू शकत नाहीत

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर भीषण कार अपघात, तीन ठार, तीन गंभीर जखमी

67 प्रवाशांना घेऊन जाणारे अजरबैजानचे विमान कैस्पियन समुद्राजवळ कोसळले

पुढील लेख
Show comments