Marathi Biodata Maker

बच्चन यांची लोक बिरादरीला २५ लाखांची देणगी

Webdunia
शनिवार, 8 सप्टेंबर 2018 (17:08 IST)
'कौन बनेगा करोडपती' या गेम शोमध्ये पद्मश्री डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी २५ लाख रुपये जिंकले. यानंतर महानायक अमिताभ बच्चन यांनी स्वतः २५ लाखांची देणगी लोक बिरादरी प्रकल्पाला दिली आहे. मात्र बच्चन यांनी या देणगीचा उल्‍लेख कार्यक्रमामध्ये टाळला. ही माहिती आमटे यांच्या फेसबुक अकाऊंटवरून देण्यात आली आहे. 
 
लोक बिरादरी प्रकल्‍पाची जागतिक पातळीवर एक वेगळी ओळख आहे. त्यांच्या कामाची दखल अनेक संस्‍थांनी घेतली आहे.  अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाध्ये आमटे दांपत्‍य सहभागी झाले होते. खेळ खेळून त्यांनी २५ लाखाची रक्‍कम जिंकली. यावेळी कार्यक्रमाचे मुख्य सूत्रधार असलेले अमिताभ बच्चन यांनी कार्यक्रम झाल्यावर लोक बिरादरीसाठी २५ लाखांची देणगी देत असल्याचे आमटे दांपत्‍यांना व्‍यक्‍तिगत सांगितले.
 
अमिताभ बच्चन यांनी स्वतःचे २५ लाख रुपये महारोगी सेवा समिती वरोराद्वारा संचालित लोक बिरादरी प्रकल्पाच्या खात्यात जमा केले आहेत. अमिताभ यांनी स्वतःच्या देणगीचा कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात जाहीर उल्लेख केला नाही ही गोष्टी मोठी असल्याचे आमटे यांनी सांगितली. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

LIVE: विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा पिवळा इशारा जारी

मुंबई : मालाड येथे फळांवर उंदीर मारण्याचे विष फवारल्याप्रकरणी पोलिसांनी विक्रेत्याला अटक केली

पनवेल-अलीपुरद्वार अमृत भारत एक्सप्रेस सुरू

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा २०२६ चे उद्घाटन केले

महाराष्ट्रातील हवामानात बदल, काही भागात तीव्र उष्णतेच्या लाटा तर काही भागात पावसाचा इशारा

पुढील लेख
Show comments