Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Life after lockdown लॉकडाउन नंतर भारतीयांचे आयुष्य कसे असेल?

नवीन रंगियाल
शुक्रवार, 17 एप्रिल 2020 (13:05 IST)
14 एप्रिल रोजी संपणाऱ्या 21 दिवसांच्या लॉकडाउनची मुदत वाढवून 3 मे पर्यंत करण्यात आली आहे. म्हणजे आपले जीव वाचविण्यासाठी घरी आणखी काही दिवस राहावे लागणार आहे. बहुतेक लोकं प्रतीक्षा करीत आहे ते म्हणजे लॉकडाउन संपल्यानंतर आपले आयुष्य कसे असणार.

1 ठराविक वेळेत उघडतील बाजार - लॉकडाउन संपल्यानंतर असे नाही की सर्व बाजारपेठ आणि शहरे एकत्र उघडतील आणि सर्वकाही पूर्वीसारखेच सामान्य होईल. काही सवलतीसह बाजारपेठ सुरू होतील. या सवलती दरम्यान, लोकांना बाहेर जाऊ देतील. या साठी शासनातर्फे मार्गदर्शक सूचना देण्यात येतील.
 
2 रेल्वेमधून प्रवास करणे सोपे नसणार - रेल्वेमधून प्रवास करण्यासाठी आपल्याला बऱ्याच नियमांचे पालन करावे लागणार आहे. पीटीआयच्या म्हणण्यानुसार एका मोठ्या अधिकाऱ्याने सांगितले आहे की रेल्वे सध्या उत्पन्नाचा विचार न करता प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करीत आहे. लॉकडाउन नंतर देखील सर्व प्रवासी तोंड बांधून असणार. अशी अपेक्षा बाळगतो.
 
3 तर रेल्वेने प्रवास करणे अशक्य - असे शक्य आहे की आरोग्य सेतू ऍपच्या साहाय्याने प्रवाशांची तपासणी केली जाईल. त्या तपासणीमध्ये कोणी प्रवाशी अस्वस्थ आढळल्यास त्याला प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही.
 
4 थर्मल स्क्रीनिंग नंतर प्रवेश - विमानतळावर जसे प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग केले जाते. तश्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग करणे अनिवार्य असणार.
 
5 हॉट-स्पॉट त्वरित कळेल - कोरोना पासून मुक्त झालेली शहरे तर ठीक आहे पण ज्या शहरांची नावे हॉट स्पॉट म्हणून नोंदल्या आहे त्यांचा वर जातीने लक्ष दिले जाणार आहेत. अश्या शहरांमधे ट्रेनचे आवागमनच रद्द करण्यात येईल किंवा अश्या हॉट स्पॉट शहरांसाठी तिकीटच मिळणार नाही.
 
6 हॉटेलमध्ये स्क्रीनिंग करावी - आपल्याला काही कारणास्तव गावी जावे लागले आणि त्या शहरात एखाद्या हॉटेलात राहण्याची वेळ आली तर थर्मल स्क्रीनिंग केले जाऊ शकते आणि त्यात आपणास तापाचे निष्पन्न झाल्यास आपल्याला हॉटेलमध्ये चेक इन करण्याची परवानगी मिळणार नाही.  
 
7 आजारी असल्यास कोणीलाही भेटता येणार नाही - या पूर्वी आपण आजारी असल्यावर लोकं आपणास भेटावयास यायचे. पण सध्याची एकंदरीत परिस्थिती बघून या पुढे आपणांस भेटावयास कोणीही येणार नाही. आपले आप्तेष्ट मित्र मंडळ आणि नातेवाईक आता आपल्या तब्येतीची विचारपूस फक्त फोनवरच करतील.
 
8 समारंभ किंवा उत्सव साजरा करता येणार नाही - आतापर्यंत आपण समारंभात खूप एन्जॉय केले असणार पण आता असे करणे शक्य नसणार. 10 किंवा त्याहून अधिक लोकं एकत्र आल्यास आपल्याला तशी परवानगी घ्यावी लागेल किंवा समारंभात येणाऱ्यांची चौकशी किंवा तपासणी केली जाऊ शकेल.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments