Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुणे येथे १५वे ‘महाटेक- २०१९’ हे व्यावसायिक प्रदर्शन

Webdunia
बुधवार, 6 फेब्रुवारी 2019 (10:20 IST)
१५वे ‘महाटेक- २०१९’ हे व्यावसायिक प्रदर्शनात दि. ७ ते १० फेब्रुवारी २०१९ दरम्यान कृषी महाविद्यालय पटांगण (नवीन), सिंचननगर, शिवाजीनगर, पुणे येथे सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत पार पडणार आहे. या चार दिवसाच्या व्यावसायिक प्रदर्शनात अत्याधुनिक उत्पादने, यंत्रे व उपकरणे विपणनासाठी आणि विक्रीसाठी प्रदर्शनात उपलब्ध ठेवण्यात येणार आहे.यावेळी नाशिक मधील अनेक नामांकित कंपन्या जसे सॅम कंन्स्लटंट, शमम इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज, सावळाराम इंटरप्राइसेस, इलेक्ट्रॉनिक स्विचेस इंडिया यांचा समावेश आहे. 
 
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे उद्योग आणि खनन मंत्री श्री. सुभाष देसाई, अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री. गिरीश बापट, पुण्याच्या महापौर मुक्त टिळक, थर्मॅक्स लिमिटेड चे कार्यकारी उपाध्यक्ष श्री. प्रवीण कर्वे, बीएसई एसएमई बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे प्रमुख श्री. अजय ठाकूर हे उपस्थित राहणार आहे.
 
या प्रदर्शनासाठी उद्योग मंत्रालय, महाराष्ट्र राज्य आणि इंडो - आफ्रिकन चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्री, स्कूल  ऑफ  इन्स्पिरेशनल  लिडरशिप , COSIA (चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशन), TSSIA (ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन) यांचे सहकार्य लाभले आहे.या प्रदर्शनात ३०० पेक्षा अधिक कंपन्या सहभागी होणार असून तीस ते चाळीस हजार उद्योजक भेट देणार आहेत. हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत असून, ऑनलाईन नोंदणी सेवा उपलब्ध आहे.महाटेक’ मध्ये आधुनिक तंत्रज्ञान, आणि उपकरणे भारतीय सेवा क्षेत्रातील संधी यांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.  तसेच प्रत्येक विभागातील आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रदर्शनाच्या माध्यमातून आपली उत्पादने ग्राहकांसाठी उपलब्ध करणार आहेत. 
 
महाटेक २०१९ या प्रदर्शनात ३०० पेक्षा अधिक कंपन्या सहभागी होणार असून त्याला तीस ते चाळीस हजार उद्योजक भेट देतील असा अंदाज आहे. या प्रदर्शनात प्रत्येक क्षेत्रातील उद्योजक सहभागी होत असून मोठ्या उद्योजकांपासुन ते लघु उद्योजकांपर्यत आणि आंतरराष्ट्रीय ब्रॅंडपर्यंत सर्व घटकांचा समावेश आहे. प्रक्रिया, उपकरणे, इलेकट्रीकल आणि इलेक्ट्रॉनिक, मशिनरी आणि मशीन टूल, इन्स्त्रूमेंटेशन आणि ऑटोमेशण उपकरणे या चार प्रकारामध्ये प्रदर्शनाचे वर्गीकरण करण्यात आले आहे .

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, 3 ठार

मुंबईत व्हॉट्सॲप वर मेसेज आला अभियंत्याने गमावले 62 लाख रुपये

Republic Day 2025: प्रजासत्ताक दिन फक्त 26 जानेवारीलाच का साजरा केला जातो? थीम आणि इतर माहिती

चालत्या ट्रेनमधील एका प्रवाशाला बेदम मारहाण, प्रवाशाचा मृत्यू

LIVE: संतोष देशमुख प्रकरणात ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची एंट्री

पुढील लेख
Show comments