Marathi Biodata Maker

पंतप्रधान मोदींवर शिवसेनेची टीका : मोदी तुम्ही कुठे आहात? सत्य मारू नका

Webdunia
बुधवार, 4 एप्रिल 2018 (15:19 IST)
आधी धर्माच्या नावावर देश तुटला आहे. तर आता देशात जातीय तेढ निर्माण केली जात आहे. कोणावरही अन्याय नकोय. मात्र केंद्र सरकारच्या हातात काहीच नाही का ? देशात अंतर्गत कलह निर्माण झाला असतात मात्र केंद्र सरकार कोर्टापुढे हतबल उभे आहे. मागासवर्गीयांवर अन्याय नकोय मात्र इतरांवरही नकोय. डॉ. आंबेडकर यांनी  दिलेल्या घटने नुसार देश न्याय व्यवस्था काम करते. या न्याय व्यवस्थेचा मुडदा पाडू नका अशी जोरदार टीका दैनिक सामना मधून भाजपा सरकार आणि पंप्रधान मोदी यांच्यावर केली आहे. काय आहे आजचा सामना वाचा : 
देश एकदा धर्माच्या नावावर फुटला. आता जातीच्या नावावर तोडण्याचे प्रयत्न सुरू असताना पंतप्रधान मोदी कुठे आहेत व काय करीत आहेत? भारतरत्न डॉ. आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार आहेत. त्याच ‘घटने’नुसार न्यायालये काम करीत आहेत. पण न्यायालयांनी निर्भीडपणे व निःपक्षपातीपणे काम करू नये अशी परिस्थिती निर्माण करण्यात येत असेल तर येणारा काळ कठीण आहे. न्यायालयाने निर्णयाचा फेरविचार करावा अशी याचिका घेऊन केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या दारात याचक म्हणून उभे आहे. हे मजबूत राज्यकर्त्याचे लक्षण नाही. दलितांवर अन्याय नकोच, पण दलित अत्याचार विरोधी कायद्याचा इतरांवरही अत्याचार नको. न्यायालयाने जे सांगितले ते सत्य आहे. ‘सत्यमेव जयते’चा मुडदा पडेल असे काही घडू नये.हिंदुस्थानात अराजक उसळेल, असे शिवसेनाप्रमुख जाहीरपणे सांगत असत. गेल्या चार वर्षांपासून या संभाव्य अराजकाची गिधाडे फडफडताना दिसत आहेत. हे चित्र भयावह असून सोशल मीडियावर व्यक्तिपूजेचे भजन करणाऱ्या टाळकुट्यांनी त्यांची डोकी ठिकाणावर आणली नाहीत तर हा देश जातीय फाळणीच्या खाईत कोसळल्याशिवाय राहणार नाही. हिंदुस्थानच्या अनेक भागांत जातीय हिंसेचा आगडोंब उसळला आहे. दलित आणि आदिवासी अत्याचारविरोधी कायदा (ऍट्रॉसिटी) सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशाने बोथट झाल्याचा निषेध म्हणून काही दलित संघटनांनी ‘हिंदुस्थान बंद’पुकारला. त्या बंदला हिंसक वळण लागले. गुजरात, बिहार, झारखंड, पंजाब, हरयाणा, उत्तराखंड, ओडिशा, बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांत आंदोलक रस्त्यावर उतरले. पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यात ११ जण ठार झाले आहेत. गुजरात हे पंतप्रधानांचे राज्य आहे. ओडिशा व पंजाब वगळता दंगली उसळलेल्या राज्यांत भारतीय जनता पक्षाची सरकारे आहेत. महाराष्ट्राचे नाव त्यात नाही असे ज्यांना वाटते त्यांनी भीमा-कोरेगाव दंगलीचा वणवा कालच पेटला होता व आता अद्याप पूर्ण विझलेला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. तिकडे पश्चिम बंगालात आसनसोल येथे हिंदू व मुसलमानांत हिंसक दंगल उसळली आहे व तेथेही प्रचंड मनुष्यहानी झाली. रामनवमीच्या निमित्ताने भाजपसमर्थक संघटनांनी हाती नंग्या तलवारी परजवीत ‘जुलूस’काढला व तेथूनच दंगलीला सुरुवात झाली. या दंगलीचे खापर ममता बॅनर्जी यांच्यावर फोडले जात असेल तर भाजपशासित राज्यात काल उसळलेल्या दंगलीस जबाबदार कोण? नेतृत्व कमजोर व स्वार्थी बनले की अशा दंगली उसळतात. देश एकदा धर्माच्या नावावर फुटला. आता जातीच्या नावावर तोडण्याचे प्रयत्न सुरू असताना पंतप्रधान मोदी कुठे आहेत व काय करीत आहेत? दलित संघटनांना काही मंडळींनी फूस लावून स्त्यावर उतरवायला लावले व दंगल घडवली असा आरोप आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

BMC Election 2026 : ठाकरे बंधूंचा जाहीरनामा ४ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार, तर भाजप ५ तारखेनंतर प्रसिद्ध करणार

कसाबला पकडणारे IPS अधिकारी सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे डीजीपी, ते नवीन वर्षात पदभार स्वीकारतील

Rules Changes From 1 January 2026 आजपासून हे प्रमुख नियम बदलले, ज्यांचा थेट तुमच्या खिशावर परिणाम होऊ शकतो

२०२६ च्या मध्यापर्यंत, १० लाख भारतीय कॅनडामध्ये बेकायदेशीर ठरतील!

सारा तेंडुलकरच्या हातात बिअरची बाटली धरलेला व्हिडिओ व्हायरल, युजर्स ट्रोल करत आहेत

पुढील लेख
Show comments