Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तानाजींच्या घराचा होणार जीर्णोद्धार

Tanaji s house
Webdunia
सोमवार, 16 मार्च 2020 (14:05 IST)
महाराष्ट्रातील 'उमरठ' या गावाला ऐतिहासिक महत्व आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांचे हे जन्मस्थान, याच गावात त्यांच्या घराची वास्तू होती जी भूमिगत झाल्याचे दिसते आहे. या भूमिगत झालेल्या वास्तूच्या जागी नव्या वास्तूचा जीर्णोद्धार करण्याचे याच गावात बालपण घालवलेल्या हरीओम घाडगे यांनी ठरवले. याच गावात लहानाचे मोठे झालेले हरीओम घाडगे यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने या वास्तूच्या भूमीचा जीर्णोद्धार करण्यासाठी पाऊल उचलले आहे. हरीओम घाडगे यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांना नेहमीच स्फुर्ती आणि प्रेरणा स्थान मानलं आहे. 
तानाजी आणि सूर्याजी यांचे धैर्य, जिद्द, बंधू प्रेम हे संस्कार त्यांच्यावर केले गेले आहेत. त्यांच ऋण कुठे तरी फेडाव असं त्यांना वाटत असताना शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून तान्हाजी मालुसरेंच्या घराच्या वास्तूचा जीर्णोद्धार करण्याचे त्यांनी ठरवले आणि भूमीचे पूजन केले. या वास्तूच्या बांधणीसाठी लागणार नियोजन, नकाशांच्या प्रति तसेच निधी हरीओम घाडगे यांच्याकडून दिला जाणार आहे मात्र तेथील गावकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्या वस्तूच्या पुनः निर्मितीसाठी श्रमदान करण्याचे ठरविले आहे. हरिओम घाडगे यांनी एक कलाकार आणि निर्माता म्हणून आपली कारकीर्द सुरु करणार असल्याची घोषणा सुद्धा या ठिकाणी केली. त्यांच्या श्री हरी स्टुडिओस निर्मित आशिष नेवाळकर लिखित आणि दिग्दर्शित 'हरी-ओम' या चित्रपटाच्या संहितेचे पूजन आणि अनावरण ही ह्या प्रसंगी करण्यात आले. या निमित्ताने चित्रपटातील सर्व टीम सुद्धा उपस्थित होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

नागपुरात देशातील पहिली स्किन बँक उभारण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

फिफा प्रमुख जियानी इन्फँटिनो यांनी फुटबॉलच्या विकासात स्पर्धाच्या प्रभावाचे कौतुक केले

आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी सौरव गांगुली यांची पुन्हा निवड

५ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या करणारा आरोपी चकमकीत ठार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी पुन्हा काळी जादू केली!’ आदित्य ठाकरेंचा मोठा दावा

पुढील लेख
Show comments