Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पैशांमध्ये मोजता न येणारी वाजपेयी यांची श्रीमंती

Webdunia
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018 (15:51 IST)
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी २००४ मध्ये लखनऊ येथून लोकसभेची निवडणूक लढविताना निवडणूक आयोगाला दिलेल्‍या माहितीनुसार, त्‍यांच्याकडे ५८ लाख रूपये संपत्‍ती होती. वाजपेयी यांचे स्टेट बँकमध्ये दोन अकाऊंट होते. त्यातील एका अकाऊंटमध्ये २० हजार रुपये तर दुसऱ्या अकाऊंटमध्ये ३ लाख ८२ हजार ८८६ रुपये ४२ पैसे एवढी रक्कम होती. याच बँकेच्या अजून एका अकाऊंटमध्ये २५ लाख ७५ हजार ५६२ रुपये ५० पैसे एवढी रक्कम होती.
 
वाजपेयी यांनी आपल्‍याकडील संपत्‍तीचा नेहमीच समाजासाठी वापर केला होता. त्‍यांच्या आग्रा येथे राहणाऱ्या बहिणीकडे गॅस नव्हता तर, खासदारांना गॅस कनेक्‍शनचा कोटा असतो, पण त्‍या कोट्यातून त्‍यांनी बहिणीला गॅस दिला नव्हता आणि त्‍यांनीही कधी मागितला नाही. ‘अपने दम पे खडे रहो, नही तो भांग पीकर पडे रहो’’ असे त्‍यांचे सांगणे असे.
 
अटल बिहारी वाजपेयी यांनी एका मुलाखतीदरम्‍यान सांगितले हाते की, ‘‘१९८७ मध्ये किडनीच्या आजाराने त्रस्त असताना त्यांच्याकडे अमेरिकेत जाऊन उपचार करण्यासाठीही पैसे नव्हते. त्‍यावेळी तत्‍कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी वाजपेयी यांना उपचारासाठी मदत केली होती. राजीव गांधींनी केल्‍या मदतीसाठी त्‍यांनी अनेक सार्वजनिक सभांमध्ये त्यांचे याबद्दल आभारही मानले होते.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments