rashifal-2026

चेहराच तुमचा बोर्डिंग पास

Webdunia
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018 (00:15 IST)
बंगळुरू विमानतळावर नवीन, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊन, जिथे बोर्डिंग पासद्वारे यात्रेकरूचे नाव, तो प्रवासास जात असलेले ठिकाण, विमान सुटण्याची वेळ, बोर्डिंग गेट इत्यादी माहिती उपलब्ध होत असे, तिथे आता ही सर्व प्रक्रिया 'बायोमेट्रिक सेल्फ बोर्डिंग टेक्नोलॉजी' चा वापर करून करण्यात येणार आहे. त्यामुळे आता ही प्रक्रिया संपूर्णपणे 'पेपरलेस' असणारा बंगळुरू भारतातील पहिलाच विमानतळ ठरणार आहे. बायोमेट्रिक सेल्फ बोर्डिंग टेक्नोलॉजीच्या वापरामुळे 'यात्रेकरूचा चेहराच त्याचा बोर्डिंग पास' असणार आहे. बंगळुरू इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड, बंगळुरू विमानतळ व्यवस्थापन आणि 'व्हिजनबॉक्स' यांच्यामध्ये यासंबंधी करार झाला असून, या द्वारे लवकरच बायोमेट्रिक स्लेफ बोर्डिंग सिस्टमचा वापर करीत, बोर्डिंग प्रक्रिया संपूर्णपणे 'पेपरलेस', म्हणजेच बोर्डिंग पास किंवा तत्सम कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांच्या वापराविना केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या उपक्रमाचा पहिला टप्पा 2019 सालच्या मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, यामध्ये जेट एअरवेज, एअर एशिया आणि स्पाइस जेट या विमानसेवांच्यामर्फत प्रवास करणार्‍या यात्रेकरूंना सर्वप्रथम पहिल्या टप्प्यामध्ये या उपक्रमाचा लाभ घेता येणार आहे. या विमानतळावर लवकरच आणण्यात येणारी बायोमेट्रिक सेल्फ बोर्डिंग टेक्नोलॉजी अतिशय आधुनिक असून, यामुळे विमानप्रवासाच्या दरम्यान रजिस्ट्रेशनपासून ते विमानांमध्ये बोर्डिंग होईपर्यंत सर्वच प्रक्रिया ऑटोमेटेड आणि अतिशय सोयीची होणार असल्याचे सांगण्यात आले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

LIVE: नांदेडमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या आधी काँग्रेस उमेदवाराच्या पतीवर हल्ला

तिकीट नसलेल्या प्रवासीकडे दंड मागितल्यानंतर टीटीईला मारहाण; पाच जणांना अटक

महाराष्ट्र नगरपालिका निवडणुकीपूर्वी नांदेडमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या पतीवर हल्ला

सेक्स करण्यास नकार दिल्यामुळे १८ वर्षीय तरुणाने ३४ वर्षीय इंजीनियरची हत्या केली!

पंजाबमधील शाळांना बॉम्बची धमकी; परिसरात दहशत पसरली

पुढील लेख
Show comments