Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Lok Sabha Election 2024: भवानी शब्दावर निवडणूक आयोगाचा आक्षेप, उद्धव म्हणाले

Webdunia
रविवार, 21 एप्रिल 2024 (15:35 IST)
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गट शिवसेनेला नोटीस पाठवली आहे. निवडणुकीने पक्षाच्या मशाल थीम साँगवर आक्षेप व्यक्त केला आहे. या गाण्याच्या शेवटी ‘जय भवानी’ या उल्लेखावर आक्षेप घेण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार हिंदू धर्मात भवानी हा शब्द ‘देवी’साठी वापरला जातो. अशा स्थितीत निवडणूक आयोगाने गाण्यातील धार्मिक घोषणेवर आक्षेप व्यक्त केला आहे. शिवसेनेचे हे थीम साँग 16 एप्रिलला प्रदर्शित झाले. निवडणूक आयोगाच्या नोटिशीला उत्तर देताना उद्धव यांनी हा महाराष्ट्र आणि कुल देवीचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. यासोबतच ते म्हणाले की, भाजप नेत्यांनी धर्माच्या नावावर अनेकवेळा मते मागितली, मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.

उद्धव म्हणाले, "कर्नाटक निवडणुकीत पीएम मोदींनी जय बजरंग बली म्हणत मतदान करण्याबाबत बोलले. अमित शहा मध्यप्रदेशातील निवडणूक प्रचारादरम्यान लोकांना राम मंदिराचे मोफत दर्शन देण्याबाबत बोलत होते. मी याबाबत पत्र लिहिले आहे. फक्त हा नारा देऊन निवडणूक आयोगाने आपल्या नियमात काही बदल केला आहे की नाही,हे मला जाणून घ्यायचे  आहे. गर्व ने म्हणा  आम्ही हिंदू आहोत हा नारा दिल्या मुळे बाळा साहेबांना निवडणूक आयोगा नेया संदर्भात निवडणूक लढवण्यावर 6 वर्षांची बंदी घालून अन्याय केला. याचे उत्तर मला आजपर्यंत मिळालेले नाही, या पत्राचे उत्तर काल रात्री आम्हाला निवडणूक आयोगाकडून मिळाले, ज्यात त्यांनी आमच्या नवीन पक्षाच्या निवडणूक चिन्ह मशालच्या थीम साँगमधून "हिंदू आणि भवानी" हे दोन शब्द काढून टाकण्याची सूचना दिली.
 
उद्धव पुढे म्हणाले की, "आम्ही भाजपप्रमाणे हिंदू धर्मावर मतांची भीक मागितली नाही. तसेच 'जय भवानी' म्हणणाऱ्याला मतदान करावे लागेल, असे आम्ही म्हटले नव्हते, पण तरीही आम्हाला निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली होती.
 
भवानी ही महाराष्ट्राची कुलदैवत आहे, आम्ही भवानी आणि हिंदू धर्माला आपल्या समाजातून काढून टाकणार नाही हे खपवून घेतले जाणार नाही.
 
त्याचा व्हिडिओ 16 एप्रिलला पार्टीच्या सोशल मीडिया हँडलवरही शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओच्या शेवटी शिवसेना समर्थक जय भवानीचा नारा देताना ऐकू येत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना शिवसेनेच्या वतीने लिहिले आहे की, "हुकूमशाहीविरोधात शिवसेनेची मशाल पेटणार आहे.व्हिडिओच्या शेवटी ठाकरे कुटुंबातील तीन पिढ्या एकत्र दिसत आहेत. बाळासाहेब ठाकरेंसोबत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेही इथे दिसत आहेत.

Edited By- Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गृहस्थ जीवनासाठी महादेवाचे 15 संदेश

श्री तुळजा भवानी मातेला का दिली जाते पलंगावर निद्रा

Chandra Dosh Mukti शरद पौर्णिमेला हे करा धनलाभ मिळवा

एखादा कीटक चावला असेल तर सावधान! कीटक चावल्यास काय करावे

राग केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो का?जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

भाजप आज जाहीर करणार 50 उमेदवारांची पहिली यादी ! MVA मध्ये 80 जागा अडकल्या !

टोमॅटोने भरलेला ट्रक उलटल्याने लुटण्यासाठी आला जमाव, रात्रभर पोलिसांनी दिला पहारा

महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का, आचारसंहिता भंग प्रकरणी महायुतीच्या शिंदे सरकारवर कारवाई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खासदार मुलावर महाकाल मंदिराच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप

धमकीनंतर अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर वाढवण्यात आली सुरक्षा

पुढील लेख
Show comments