Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लोकसभा निवडणूक:शरद पवार यांनीच मला भाजपसोबत सरकार स्थापन करण्यास सांगितले अजित पवार यांचा दावा

Webdunia
रविवार, 21 एप्रिल 2024 (17:14 IST)
लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या उत्साहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा दावा केला आहे. एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, महाराष्ट्राचे दिग्गज नेते शरद पवार यांनीच मला भाजपसोबत सरकार स्थापन करण्यास सांगितले होते.
 
शरद पवार यांनीच मला आणि इतर काही नेत्यांना भाजपशी हातमिळवणी करण्यास सांगितले होते, असा दावा अजित पवार यांनी केला. याबाबतचे पत्र आपल्याकडे असून गरज पडल्यास ते दाखवू असेही त्यांनी सांगितले. आपल्या मुलाखतीत अजित पवार यांनी आपल्या पत्नीने निवडणूक लढविल्याच्या विरोधकांच्या आरोपावर बोलताना, आपल्या पत्नीला बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यासाठी कोणाचाही दबाव नव्हता.असे सांगितले.

आम्ही आमचा उमेदवार निवडला आहे. यासाठी माझ्यावर कोणताही दबाव नव्हता. पवार विरुद्ध पवार अशी ही लढत नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यातील लढत आहे. ते पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही मते मागत आहोत. 400 पार होतील की नाही माहीत नाही, पण प्रयत्न सुरू आहेत.
 
 
Edited By- Priya Dixit  

संबंधित माहिती

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

प्रामाणिकपणा ! मुंबईत सफाई कामगाराला रस्त्यावर 150 ग्रॅम सोनं सापडलं, पोलिसांच्या ताब्यात‍ दिले

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

पुढील लेख
Show comments