Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘हुतूतू’मध्ये झळकणार लोकप्रिय जोडी

Webdunia
गुरूवार, 22 मे 2014 (12:07 IST)
नात्यांची अनोखी धोबीपछाड असं कथासूत्र असणार्‍या ‘हुतूतू’ या आगामी सिनेमाचं म्युझिक लाँच नुकतंच कलाकार आणि तंत्रज्ञांच्या उपस्थितीत झालं. प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री वर्षा उसगावकर ही लोकप्रिय जोडी या विनोदी सिनेमात दीर्घकाळानंतर एकत्र दिसणार आहे.

सिनेमात जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे, नेहा पेंडसे, मानसी नाईक, अनंत जोग, प्रदीप पटवर्धन, जयवंत भालेकर, अतुल तोडणकर, संजय खापरे आणि कांचन अधिकारी अशी कलावंतांची तगडी फौज या सिनेमासाठी एकत्र आली आहे. त्याग आणि समर्पणाला प्रेम मानणारी जुनी पिढी आणि प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारी नवी पिढी यांच्यातला संघर्ष या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

प्रकाश राणे यांनी लिहिलेल्या गाण्यांना आनंद राज आनंद यांनी संगीत दिलं आहे. ‘हुतूतू’ या शीर्षक गीतासह, ‘लाडीगोडी’ आणि ‘लैला मेरी लैला’ अशी तीन गाणी सिनेमात आहेत. संगीतकार आनंद राज आनंद यांचे संगीत असलेल्या लोकप्रिय हिंदी गाण्यांचा आस्वादही प्रेक्षकांना या सिनेमात घेता येणार आहे. हर्षवर्धन भोईर आणि भाऊसाहेब भोईर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. 

लाडीगोडी गीत पहा 

सर्व पहा

नक्की वाचा

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

सर्व पहा

नवीन

जागतिक संगीत दिनानिमित्त आयुष्मान खुराना यांनी ‘रह जा!’ या गाण्याची झलक दाखवली

शत्रुघ्न सिन्हा पत्नीसह मुलगी सोनाक्षीच्या सासरच्या घरी पोहोचले, झहीर इक्बाल पाया पडला

अनुपम खेर यांच्या कार्यालयातुन सामान चोरी, गुन्हा दाखल

श्री महालक्ष्मी कोल्हापूर

जगप्रसिद्ध 'नायगारा फॉल्स'!

Show comments