Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'फॉरेनची पाटलीण' कोल्हापूरात

- राम कोडींलकर

Webdunia
PR
परदेशी कलावंताची मुख्य भूमिका असलेल ा 'फॉरेनची पाटलीण' हा मराठी चित्रपट शुक्रवारी (ता.९) प्रदर्शित होत आहे. यात बिलयाना रॅडॉनिच या सर्बियातील महिलेची मुख्य भूमिका असून एस ४ एंटरटेन्मेंटने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

सुरवातीला पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली या दोन जिल्ह्यांमध्ये प्रदर्शित होत आहे. त्यापाठोपाठ हा चित्रपट मराठवाडा, विदर्भ, खानदेश, उत्तर महाराष्ट्रसह कोकणातही दिमाखात प्रदर्शित होणार आहे.

PR
विदेशी कलाकारांना घेऊन हिंदी चित्रपट अनेकदा झाले आहेत. त्याचे कौतुकही झाले. मराठीला मात्र हा प्रकार नवा आहे. राज कपूर, देव आनंद, मनोज कुमार अशांनी तर अनेकदा विदेशींकडून आपल्या चित्रपटात काम करवून घेतले. मराठीतही १-२ अपवाद वगळता विदेशी कलाकार दिसले पण त्यांच्या व्यक्तिरेखा नगण्य होत्या. मात्र 'फॉरेनची पाटलीण' ची नायिका खरोखरीच फॉरेनची आहे. तिचे खरे नाव आहे - बिलियाना रॉडोनिच. या चित्रपटात तिने मध्यवर्ती म्हणजे नायिवेत्र्ची भूमिका वेत्र्ली आहे. मराठीत प्रथमच असे घडत आहे.

चित्रपटाची निर्मिती संजीवनी गवई यांनी आपल्या 'एस ४ एंटरटेन्मेंट' बॅनरखाली वेत्र्ली आहे. चित्रपटाच्या निर्मितीचा हा पहिलाच अनुभव असला तरी आपल्या मनात नेहमीपेक्षा वेगळा चित्रपट द्यायचा असे मनात होते. तसेच पडद्यावर साकल्याचे संजीवनी गवई म्हणाल्या. मराठी प्रेक्षकांचे दर्जेदार मनोरंजन करण्याच्या तळमळीतून आपण या क्षेत्रात उडी घेतल्याचे त्यांनी सांगितले.

PR
' फॉरेनची पाटलीण'च्या विषयाबद्दल बोलताना दिग्दर्शक प्रदीप घोणसीकर म्हणाले की, '' माती कोठेही गेले तरी मातीच असते, इथून तिथून सारखीच असते. तिला पाणी दिले की बी उगवते. माणसांच्या नात्यांचेही तसेच आहे. हाच विषय 'फॉरेनचीपाटलीण' या चित्रपटाच्या माध्यमातून मांडला आहे.'' चित्रपटाचे कार्यकारी निर्माते पवन वैद्य म्हणाले, की ''निर्माती नवीन असली तरी हात आखडता घेतलेला नसल्याने आवश्यक असलेल्या गोष्टी उपलब्ध होऊ शकल्या. नावावरुन मजेदार वाटणार्‍या या चित्रपटात भारतीय आणि पाश्चात्य संस्वृत्र्तीचा संघर्ष तर आहेच. पण त्यातील समान सूत्रांचे दर्शनही यात घडणार आहे. गावात राहूनही सुधारणा करता येते हा संदेशही यातून दिला जाणार आहे.''

या चित्रपटाला संगीतबद्ध केलंय लोकप्रिय संगीतकार अशोक पत्की यांनी. तर गावरान ढंगाची मस्त गाणी लिहिली आहे. कवी फ. मु. शिंदे यांनी. कथा-पटकथा, संवाद अशी महत्त्वाची जबाबदारी प्रताप गंगावणे यांनी पार पाडली आहे. चित्रपटाच्या निर्मितीची सूत्रे कार्यकारी निर्माते पवन वैद्य यांनी समर्थपणे सांभाळली आहेत.

चित्रपट मैने प्यार किया' ला 35 वर्षे पूर्ण, चित्रपट चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार

मल्याळम अभिनेता दिलीप शंकर हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळले

सिकंदर' चित्रपटाचा टीझर रिलीज

वरुण धवनची मुलगी लाराची पहिली झलक आली जगासमोर

सलमान खानने शेअर केले 'सिकंदर'चे पहिले पोस्टर

अमृता खानविलकरच्या विलक्षण, सुदंर नृत्यानं घातली प्रेक्षकांना भुरळ, संगीत मानापमान मध्ये पाहुणी कलाकार म्हणून गाजवलं "वंदन हो" गाणं

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

New Year 2025 : या अद्भुत ठिकाणी नवीन वर्ष करा सेलिब्रेट

दिग्दर्शक अनुराग कश्यपने मुंबई आणि बॉलिवूड सोडण्याचा घेतला निर्णय

Suresh Dhas Apologies Prajakta Mali अखेर सुरेश धसांनी मागितली प्राजक्ता माळींची माफी

Show comments