Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'F.U.- Friendship Unlimited' चा टीझर लाँच

Webdunia
मुंबई- फ्रेशन लूक, न संपणारी एनर्जी, रोमान्स, तरुणाई चा एटिड्यूड आणि फुल ऑफ लाइफने भरलेल्या या वर्षातील सर्वात धमाकेदार अशा F.U. या चित्रपटाचा भव्य टीझर लाँच सोहळा मुंबईत अनेक कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला आणि सोशल मीडिया वर काही तासांत 10 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज झाले. 
F.U. च्या या पहिल्याच लूक लूक वर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले आहेत. सैराटच्या भव्य यशानंतर करोडो लोकांच्या आणि विशेषतः तरुणींच्या मनात घर केलेल्या आकाश ठोसर F.U. या चित्रपटातून एका ट्रेंडी लुक मध्ये आपल्या समोर येत आहे. आकाश बरोबरच या टीझरमध्ये सत्या मांजरेकर, मयूरेश पेम, शुभम किरोडीयन, माधव देवचक्के, पवनदीप, वैदेही परशुरामी, संस्कृती बालगुडे, स्वामिनी वाडकर, रिया बर्मन, राधा सागर, मधुरा देशपांडे, स्वरदा ठिगळे या तरुण कलाकारांबरोबरच सचिन खेडेकर, मेधा मांजरेकर, शरद पोंक्षे, स्व. अश्विनी एकबोटे, भारती आचरेकर आणि महेश मांजरेकर या अनुभवी कलाकारांची फौज दिसते त्याचबरोबर बोमन इराणी आणि इशा कोप्पीकर हे बॉलीवूड मधील सुप्रसिद्ध कलाकार सुद्धा या चित्रपटात आहेत.
 
नटसम्राट, ध्यानीमनी या आशयघन चित्रपटानंतर महेश मांजरेकर, तमाम तरुणाई चे प्रतिनिधित्व करणाऱ्या पात्रांचा आणि आजच्या तरुणाई ची भाषा बोलणारा F.U  हा चित्रपट घेऊन येत आहेत. 
बॉलीवूड मधील कलाकारांबरोबरच फिल्म इंडस्ट्रीतील तगडे व्यावसायिक या चित्रपटाच्या  प्रदर्शनासाठी एकत्र आले आहेत, T.Series चे भूषण कुमार आणि किशन कुमार हा चित्रपट प्रस्तुत करत आहेत त्यांची हि प्रसिद्ध संस्था या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करीत आहे, त्याचबरोबर बॉलीवूड मधील अनेक भव्य आणि मोठ्या बॅनर चे चित्रपट आणि बाहुबली या चित्रपटाचे वितरक अनिल थडानी F.U.चे वितरण करीत आहेत. भूषण कुमार आणि अनिल थडानी यांनी या सोहळ्याला विशेष उपस्थिती लावली.
 
हा टीझर लाँच सोहळा गाजला तो कलाकारांच्या विशेष सादरीकरणाने. F.U. या चित्रपटातून मराठी चित्रसृष्टीत पदार्पण करणारे तरुण संगीतकार विशाल मिश्रा आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल 'यूलिया' हिने बहारदार गाण्याचे सादरीकरण केले आणि त्यानंतर F.U. च्या धमाकेदार गाण्यावर आकाश ठोसर आणि सर्व तरुण कलाकारांनी नृत्याचा ठेका धरून सोहळ्याचा कळस गाठला.  
 
विशाल मिश्रा आणि समीर साप्तीस्कर यांनी अतिशय युथफूल आणि ठेका धरायला लावणारे संगीत दिले आहे. महेश मांजरेकरांनी दिग्दर्शनाबरोबरच अभिजित देशपांडे यांच्या साथीने या चित्रपटाचे लेखन सुद्धा केले आहे. F.U. ची निर्मिती अभय गाडगीळ, महेश पटेल, दिनेश किरोडीयन आणि महेश मांजरेकर यांनी केली आहे. आजच्या तरुणाई ची भाषा बोलणारा F.U. - Friendship Unlimited हा भव्य चित्रपट येत्या २ जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

आयुष्मान खुरानाने त्याच्या पहिल्या लाईव्ह सिंगिंग परफॉर्मन्सचे श्रेय अरिजीत सिंगला दिले

भूल भुलैया 3 ने सिंघम अगेनला टाकले मागे, चार आठवड्यात 247 कोटींची कमाई

एआर रेहमानसोबतच्या नात्याच्या अफवांवर मोहिनी डे यांनी मौन सोडले

फोर्स ऑफ नेचर: द ड्राय 2 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला

अनुपमा'च्या सेटवर विजेचा धक्का लागल्याने कॅमेरा असिस्टंटचा मृत्यू, निर्माता म्हणाले-

सर्व पहा

नवीन

ब्रम्हाजी मंदिर पुष्कर राजस्थान

नागराज मंजुळे यांना महात्मा फुले समता’ पुरस्कार मिळणार

बिग बॉस फेम हिमांशी खुरानाच्या वडिलांना पाच वर्षे जुन्या प्रकरणात अटक

वायलेंट हिरो' चा काळ: ताहिर राज भसीन

जमिनीवर बसून चहा प्यायले, हातात झेंडा घेऊन चालले, Bageshwar Baba यांच्या यात्रेत Sanjay Dutt यांचा नवीन अवतार

पुढील लेख
Show comments