suvichar

इरसाल राजकारणाची भानगड मांडणार 'गाव थोर पुढारी चोर'

Webdunia
सोमवार, 30 जानेवारी 2017 (11:38 IST)
राजकारण म्हंटले की त्यातील डावपेच, छक्के-पंजे आणि हेवेदावे ओघाने आलेच. राजकरणाचे सूत्र कधी बदलेल, आणि कोणाच्या खांद्यावर स्वार होऊन कोण कधी सत्ताधारी बनेल याचा नेम नाही! अशा या राजकारणी लोकांच्या इरसाल भानगडीचा आढावा लवकरच 'गाव थोर पुढारी चोर' या आगामी मराठी सिनेमातून घेतला जाणार आहे. सत्ताधारी असो वा विरोधी पक्ष असो, खुर्चीसाठी एकमेकांचे पाय खेचणाऱ्या पुढाऱ्यांवर निशाणा साधणारा हा विनोदी सिनेमा लोकांचे भरघोस मनोरंजन करणारा ठरणार आहे.
 
'गाव थोर पुढारी चोर' हा सिनेमा मनोरंजनासोबतच राजकीय कर्तव्याची जाणीव देखील प्रेक्षकांना करून देणारा ठरणार आहे. मंगेश मुव्हीज प्रस्तुत या  सिनेमात 'पॉलिटीकल' या भारदस्त शब्दाचा अर्थ अगदी हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक पितांबर काळे यांनी केला आहे. निर्माते मंगेश डोईफोडे यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. राजकीय वर्तुळातील डावपेच विनोदीशैलीतून मांडणाऱ्या या सिनेमामध्ये दिगंबर नाईक, प्रेमा किरण, चेतन दळवी, सिया पाटील, किशोर नांदलस्कर आदी कलाकारांच्या भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पुणे आणि दौंड परिसरात या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले असून, येत्या १७ फेब्रुवारीला हा  संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

सुभेदार' मालिकेत बबली दीदीच्या भूमिकेत मोना सिंगचा नवा अवतार

'तुंबाड २' मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीची एन्ट्री; 'हस्तर'च्या रहस्यमय जगात साकारणार महत्त्वाची भूमिका!

या चित्रपटांमध्ये रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा एकत्र दिसणार

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नानिमित्त भारताच्या २३ शहरांमध्ये मिठाई वाटण्यात आली

राजपाल यादवने सुरु केला नवीन यूट्यूब चैनल

सर्व पहा

नवीन

जुनैद खान आणि साई पल्लवी यांच्या 'एक दिन' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

उन्हाळा सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्रातील या सुंदर ठिकाणांना भेट द्या

जुनैद खान आणि साई पल्लवी स्टारर 'एक दिन'चा ट्रेलर रिलीज, भावनिक प्रेमकथेने जिंकले मन

अभिनेत्री हंसिका मोटवानी आणि सोहेल कथुरिया यांचे नाते तीन वर्षांनी संपुष्टात आले

प्रसिद्ध अभिनेत्रीला रस्त्याच्या मधोमध मारली कानशिलात, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

पुढील लेख
Show comments