Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सीआयडी ढंगात रंगला 'अंड्या चा फंडा' सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा

Webdunia
धम्माल मैत्रिचा गूढ फंडा मांडणारा 'अंड्याचा फंडा' हा आगामी सिनेमा येत्या 30 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बालपणाच्या मैत्रीवर आधारित असलेला हा सिनेमा अध्यास क्रिएशनचे विजय शेट्टी यांची निर्मिती असून प्रशांत पुजारी आणि इंदिरा विश्वनाथ शेट्टी यांनी त्याची सहनिर्मिती केली आहे. शिवाय सी.आय.डी. आणि आहट यांसारख्या मालिकेचे कथालेखन करणारे संतोष शेट्टी यांच्या दिग्दर्शकीय नजरेतून साकारण्यात आलेला हा सिनेमा रसिकांचे खुमासदार मनोरंजन करणारा आहे. अथर्व बेडेकर, शुभम परब आणि मृणाल जाधव या तीन बालकलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी असलेल्या या सिनेमाचा नुकताच ट्रेलर लाँच करण्यात आला. या सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळी सिनेमाच्या संपूर्ण टीमसोबतच सी.आय.डी. फेम शिवाजी साटम, दयानंद शेट्टी आणि नरेंद्र गुप्ता या प्रसिद्ध तिकडींनीदेखील हजेरी लावली होती. 'अंड्या चा फंडा' या सिनेमाला प्रोत्साहन देण्यासाठी अभिनेता संजय कुलकर्णी तसेच सी.आय.डी. च्या संपूर्ण कलाकारांनी उपस्थिती लावत, कार्यक्रमात एक वेगळीच जाण आणली. 
दोन जिवलग मित्र आणि त्यांच्या कुरापती दाखवणारा ह्या सिनेमाचा ट्रेलर प्रत्येकाला आपल्या बालमित्राची आठवण करून देणारा ठरेल, असा आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये धम्माल मैत्रीबरोबरच आणखीन बरेच काही दडले असल्याचे दिसून येते. शिवाय अनेक वर्ष सिनेसृष्टीपासून दूर राहिलेली अभिनेत्री दीपा चौधरीदेखील या ट्रेलरमध्ये दिसून येते. विशेष म्हणजे यात तिची प्रमुख भूमिका असून, या चित्रपटामार्फत ती पुन्हा एकदा सिनेसृष्टीत कमबॅक करणार आहे. 'अंड्या चा फंडा' या सिनेमाचा ट्रेलर पाहताना हा सिनेमा एका गूढ कथेचा मागोवा घेत असल्याचे लक्षात येते. पण हे गूढ नेमके काय आहे ह्याचे स्पष्टीकरण मिळत नसल्याने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवण्यास 'अंड्या चा फंडा' या सिनेमाचा ट्रेलर पूर्णतः यशस्वी ठरला आहे. 
सिनेमाच्या ट्रेलरसोबतच अथर्व आणि शुभम वर आधारित असलेले 'डुबुक डुबुक' हे गाणेदेखील उपस्थित पाहुण्यांसमोर सादर करण्यात आले. अंड्या आणि फंडयाच्या अनोख्या मैत्रीची झलक या गाण्यात पाहायला मिळते. लहानपणाची निरागस मैत्री आणि मैत्रीतील निस्वार्थ प्रेम दाखवणारे हे गाणे आहे. हर्षवर्धन वावरे यांनी गायलेल्या या गाण्याचे लेखन क्षितीज पटवर्धन यांनी केले असून, त्याचे अमितराज यांनी संगीतदिग्दर्शन केले आहे. 
दिग्दर्शक संतोष शेट्टी यांची कथा असलेल्या या सिनेमाची पटकथा आणि संवाद अंबर हडप, गणेश पंडित आणि श्रीपाद जोशी यांनी लिहिली असल्यामुळे 'अंड्या चा फंडा' या सिनेमात दर्जेदार लेखनाची गम्मतच पाहायला मिळणर आहे. लवकरच प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमात अर्थव बेडेकर, शुभम परब, मृणाल जाधव या बालकलाकारांसोबतच दिपा चौधरी, सुशांत शेलार आणि अरुण नलावडे यांची देखील प्रमुख भूमिका असणार आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

अजय देवगण आणि काजोलच्या 'इश्क' चित्रपटाला 27 वर्षे झाली पूर्ण

सन ऑफ सरदारच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलाचे वयाच्या 18व्या वर्षी निधन

नागराज मंजुळे यांना महात्मा फुले समता’ पुरस्कार मिळणार

Rakhi Sawant: गरिबीत गेले बालपण,त्यानंतर राखी बनली बॉलिवूडची ड्रामा क्वीन

अटक टाळण्यासाठी राम गोपाल वर्मा घरातून गायब,व्हिडिओ जारी केला

सर्व पहा

नवीन

मुंबईच्या नाटकाचं उद्घाटन सानंद इंदूरच्या रंगमंचावर

पंतप्रधान मोदी पाहतील विक्रांत मॅसीचा 'द साबरमती रिपोर्ट

विक्रांत मॅसी यांनी अभिनयक्षेत्रातून घेतली निवृत्ती, वयाच्या 37 व्या वर्षी इंडस्ट्री सोडली

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी औरंगाबाद

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावले

पुढील लेख
Show comments