Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

झाले मोकळे आकाशची ध्वनीफित प्रकाशित

चंद्रकांत शिंदे
WD
बदलत्या काळात नात्याचे संदर्भ जरी बदलले तरी काही नाती मात्र सदैव साथ देत असतात. असेच एक नाते म्हणजे मातापिता आणि त्यांची मुले. त्यातही अपत्य दत्तक असेल तर त्या नात्याला एक वेगळे रूप मिळते. आईवडिलांचे आपल्या दत्तक मुलीशी असलेल्या नात्यावर आधारित झाले मोकळे आकाश या चित्रपटाचा ध्वनीफित प्रकाशन सोहळा नुकताच चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञांच्या उपस्थितीत मुंबईतील एका हॉटेलमध्ये संपन्ना झाला. सी.एस.फिल्मस बॅनरअंतर्गत तयार झालेला हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. राजेंद्र अनंत आणि योगेश महाजन यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

ज्येष्ठ कवी गीतकार गंगाधर महाम्बरे यांनी गीते लिहिली असून संगीतकार निर्मल कुमार यांनी या गीतांना मधुर चाली दिलेल्या आहेत. साधना सरगम, रविंद्र साठे, देवकी पंडीत, जयश्री शिवराम, वैशाली सामंत, अरुण इंगळे यांनी ही गीते गायली आहेत. चैताली व श्रृती या चित्रपटातील बालकलाकारांच्या हस्ते ध्वनीफित पकाशित करण्यात आली. या दोघींव्यतिरिक्त चित्रपटातील अन्य कलाकार आहेत सुबोध भावे, पल्लवी वैदय, दक्षा महेन्दु, स्वप्ना साने, चैत्रा राजेंद्र, सुवासिनी देशप ा ツडे, रमेश भाटकर, लीना भागवत, शितल शुक्ल, निलेश सावे, शिवानी क-हाडकर आणि शरद पोंक्षे. चित्रपटाचे कार्यकारी निर्माता आहेत ज्ञानेश्वर ढोके.
सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण कल्की 2898 एडी भाग 2 च्या शूटिंगसाठी सज्ज

स्त्री 3' मध्ये अक्षय कुमारची एंट्री निश्चित झाली

स्काय फोर्स चित्रपटाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज, अक्षय कुमार-वीर पहाडियाचा ॲक्शन अवतार दिसला

सोनू निगमची मराठमोळी सुरुवात,आपल्या सुमधुर आवाजाने गायलं २०२५ चं पहिलं गाणं ‘चंद्रिका’

Kangana Ranaut: या दिवशी रिलीज होणार 'इमर्जन्सी'चा ट्रेलर

सर्व पहा

नवीन

अभिनेता टिकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल

येथे स्त्री रुपात हनुमान, जाणून घ्या कुठे आणि का प्रसिद्ध आहे हे मंदिर

आता वंदे भारत ट्रेन चित्रपटात दिसणार, शूटिंगला मिळाली परवानगी

प्रसिद्ध गायक जयचंद्रन यांचे निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

51 वा वाढदिवस साजरा करत असलेला अभिनेता हृतिक रोशनने अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या

Show comments