Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तात्या विंचू आला

झपाटलेला 2

Webdunia
PR
1993 साली मराठी रूपेरी पडद्यावर झळकलेला आणि प्रचंड यश मिळविलेला सिनेमा म्हणजे झपाटलेला. अनोखी संकल्पना, वेगवान कथा-दिग्दर्शन, त्याला रहस्याची फोडणी, लक्ष्याची धमाल आणि खलनायक तात्या विंचूच्या कारवाया, यामुळे झपाटलेला आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आता 19 वर्षे उलटून गेली आहेत. इन्स्पेक्टर महेश जाधवच्या गोळीला बळी पडलेला आणि मंत्रशक्तीच्या जोरावर मृत्यूलाही आवाहन देणारा खलनायक तात्या विंचू परत आला तर.. ! याच संकल्पनेवर महेश कोठारे घेऊन आले आहेत झपाटलेला 2 हा सिनेमा.

महेश कोठारे दिग्दर्शित या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमातून तात्या विंचू आणि त्याचा बोलका बाहुला घडविणारे शब्दभ्रमकार रामदास पाध्ये यांची अचंबित करणारी कामगिरी पुन्हा एकदा बघण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. तर आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, मधू कांबीकर, राघवेंद्र कडकोळ, विजय चव्हाण आणि मकरंद अनासपुरे यांच्या दमदार अदाकारीने हा सिनेमा सजला आहे. सिलेक्ट मीडिया होल्डिंग्स प्रस्तुत आणि कोठारे अँन्ड कोठारे व्हिजननिर्मित झपाटलेला 2 हा सिनेमा थ्रीडी रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मराठीतला थ्रीडी तंत्रज्ञानावर चित्रीत होणारा हा पहिला मराठी सिनेमा आहे. येत्या 7 जूनला हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल होतोय.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments