Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फेकमफाक लवकरच

वेबदुनिया
WD
मराठी चित्रपटजगताचा ‘सुपरस्टार’ भरत जाधव हा ‘फेकमफाक’ हा आणखी एक नवा चित्रपट घेऊन जुलैमध्ये आपल्या भेटीस येतोय! ‘एमईएफएसी प्रॉडक्शन्स’ या निर्मिती संस्थेचा हा पहिलाच चित्रपट कॉमेडी थ्रिलर आहे, ‘फेकमफाक’ या चित्रपटात भरतबरोबरच विजय चव्हाण आणि विजू खोटे ही गाजलेली विनोदी दुक्कल आहे. या तिघांच्या विनोदानं प्रेक्षक खळखळून तर हसतीलच; पण त्याचवेळी चित्रपटातील रहस्य आणि थरार उलगडून दाखवताना कथेने घेतलेली वळणं बघून त्यांना एकापाठोपाठ एक धक्केही बसत राहतील. दयानंद राजन या बॉलिवूड गाजवणार्‍या दिग्दर्शकाचे मराठी चित्रपटसृष्टीतील हे पदार्पण असून ‘फेकमफाक’च्या दिग्दर्शनाबरोबरच लेखनाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे

WD
हसते खेलते, अतीत, गिरफ्त, रातरानी आणि हसीनों का मेला हे दयानंद राजन यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. चित्रपटात एकूण चार गीते असून, सध्या गाजत असलेले ‘आयटम साँग’ मराठीतील वैशाली सामंतने गायलेलं आहे. शिवाय, बॉलिवूडमधील शान आणि साधना सरगम यांनी अन्य गीतांना स्वर देऊन या चित्रपटाच्या आकर्षणात भर घातली आहे. भरत बलवली या उमद्या गायक कलावंतानं ‘फेकमफाक’च्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. या चित्रपटात आपल्याला ज्येष्ठ कलावंत अमिताभ बच्चन यांचा आवाजही ऐकायला येतो! पण तो स्वर अर्थातच सुदेश भोसले यांचा आहे.. त्यांनी या चित्रपटात अमिताभ यांच्याबरोबरच आणखी चार जणांचे आवाज आपल्याला ऐकवले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

नक्की वाचा

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

सर्व पहा

नवीन

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments