Festival Posters

मिशन पॉसिबल

Webdunia
PR
यश - रूढार्थानं पाहायला गेलं तर तो आदर्श कॉलेजिस्ट नक्कीच नाही... त्याच्या नील, नीतिन आणि मुकेश या तीन मित्रांबरोबर आणि प्रार्थना या मैत्रिणीबरोबर तो त्याचं कॉलेज लाईफ एन्जॉय करतोय... सगळ्याच अर्थानं! अगदी फ्लर्टीगपासून - धतिंगपर्यंत सगळं करतोय तो! प्रिन्सिपलपासून सगळा प्राध्यापक वर्ग हैराण आहे त्याच्यामुळे.

पण तरीही तो वाईट नाही... हे सगळ्यांना माहितीय... नाचात तर त्याचा हात धरणारा कुणीच नाही... कुणालाही मदत करायला तो सदैव तत्पर असतो... आपल्या हातून काही गैर घडणार नाही... याची तो कायम काळजी घेत असतो.

कारण त्याच्या आईवर, वंदनावर त्याचं मनापासून प्रेम आहे आणि त्याच्या हातून काही चुकीचं घडलं तर तिला खूप वाईट वाटेल हे त्याला माहितीय. यशचे वडील स्वत: गुन्हेगारी क्षेत्रातले होते. पोलिसांच्या एनकाऊंटरमध्ये त्यांचा मृत्यू झाला, वंदनानं त्याचा जबर धक्का घेतलाय. यशच्या हातून चुकूनही काही चुकीचं घडलं तर ती सहन करू शकणार नाही हे यशला माहितीय आणि म्हणूनच तो जपतोय...

पण नियतीच्या मनात काही वेगळंच आहे. यशच्या कॉलेजमध्ये जे एक स्वतंत्र विद्यापीठ आहे तिथे गेल्या काही दिवसांपासून पेपरफुटीचं प्रकरण मूळ धरतंय. मोठमोठी धेंडं त्यात गुंतलेली आहेत. कॉलेजचे प्रिन्सिपल - यशचा कॉलेजमधला कट्टर प्रतिस्पर्धी रॉनी आणि असेच इतर काही.... पण त्यांच्या मुख्य सूत्रधाराचा चेहरा अजून समोर आलेला नाही. यशला मात्र अपघातानं त्यातल्या काही जणांचे धागेदोरे मिळू लागलेयत... त्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्या गुन्हेगारांचं धाबं दणाणलंय...

आणि इकडे यशच्या आयुष्यात पर्ल येते. विलक्षण सुंदर मुलगी... आणि यश तिच्या आकंठ प्रेमात बुडतो. पर्ल त्याच्यासाठी सर्वार्थानं योग्य आहे. अगदी मेड फॉर इच अदर असं त्याला वाटू लागतं. तीही त्याला तितकाच छान प्रतिसाद देतेय. एकीकडे हे प्रेम प्रकरण ऐन भरात असताना यशचं पेपरफुटी प्रकरणाचा मागोवा घेणंही सुरू आहे.

तशात एक भव्य डान्स कॉम्पिटिशन जाहीर होते आणि कॉलेजतर्फे यशचा ग्रुप त्यात सहभागी होतो. पर्ल ही त्याची डान्स पार्टनर होती. पण उत्साहानं आणि कॉम्पिटिशन जिंकायच्या तयारीनंच प्रॅक्टिस करत होता... पण...

ऐन कॉम्पिटिशनच्या दिवशी शो सुरू असताना लाइट गेले आणि पर्लचा खून झाला, त्या खुनाचा आरोप यशवर आला. सगळे पुरावे त्याच्या विरोधात गेले आणि मग...? मग अटक... कोर्ट आणि आता जन्मपेठ... यश पुरता खचून गेला.. प्रेम कायमचं गमावल्याचं दु:ख.. बदनामी आणि पुढचं आयुष्य तुरुंगाच्या काळ्याशार वातावरणात घालवावं लागेल अशी भयावह परिस्थिती... यशला काय करावं तेच सुचेना...

आणि शेवटी त्याच्यासमोर जे सत्य आलं ते भयानक होतं... तो विचारही करू शकत नव्हता असा चेहरा गुन्हेगार म्हणून त्याच्या समोर उभा होता.. कुणाचा होता तो चेहरा? रोमान्स, थ्रिल आणि सस्पेन्सनं भरलेला असा हा चित्रपट आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

देवदासमध्ये चुन्नी बाबूची भूमिका साकारायला कोणीच तयार नव्हते, पण जॅकी श्रॉफला ती मिळाली

अमिताभ बच्चन आणि रणवीर सोबत काम केलेला अभिनेता हत्येप्रकरणी दोषी आढळला; नाव बदलून १२ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले

कंगना रणौतने हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र आणि का घातले होते?

सर्व पहा

नवीन

आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे पुन्हा वधू-वर झाले; लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी पुन्हा लग्न केले, व्हिडिओ व्हायरल

दिव्यांका त्रिपाठीने जुळ्या मुलांना जन्म दिला

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

पेड्डी'च्या प्रमोशनदरम्यान गर्दीचा गोंधळ मुळे रामचरणच्या हाताला दुखापत

डॉन ३' सोडल्यानंतर रणवीर सिंगवर एफडब्ल्यूआयसीईने बंदी घातली

Show comments