Marathi Biodata Maker

'राक्षस' सिनेमाची कथा सातासमुद्रा पार

Webdunia
गुरूवार, 26 नोव्हेंबर 2015 (14:38 IST)
दर्जेदार सकस आणि मनोरंजनाने परिपूर्ण सिनेमे तयार करण्यात हातखंड असलेल्या नवलखा आर्ट्स आणि होली बेसिल प्रॉडक्शन हाउस निर्मित 'राक्षस' हा आणखी एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणाला २३ नोव्हेंबर पासून सुरवात झाली आहे. राक्षस सिनेमाच्या निमित्ताने मराठी चित्रपटातील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता शरद केळकर यांची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. खलनायकाची भूमिका करूनही महाराष्ट्राचा फेव्हरेट झालेला संग्राम म्हणजेच शरद या 'राक्षस' सिनेमात सकारात्मक भूमिकेत आहे. 
सिनेमाचा जॉनर काहीसा फॅमिली थ्रिलर आहे. त्यात एंटरटेनमेंट सोबत सस्पेन्स, थ्रिलर आणि इमोशन ड्रामा असलेला फॅमिली एंटरटेनिंग सिनेमा पाहायला मिळेल. त्यामुळे येत्या वर्षातील हा अप्रतिम सिनेमा ठरेल. सिनेमाची कथा कौटुंबिक भावनिक दर्शन घडवणारी आहे. बालकलाकार ऋजुता देशपांडे साकारत असलेली मुन्नी ही व्यक्तिरेखा सिनेमात महत्वाची भूमिका बजावते. 'शाळा', 'फॅंड्री', 'सिद्धांत' या सिनेमाच्या यशानंतर निलेश नवलखा आणि विवेक कजारिया यांची निर्मिती असलेले 'चौर्य', 'राक्षस' आणि 'एक नंबर' हे सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. सिनेमाची कथा आणि दिग्दर्शन ज्ञानेश झोटिंग यांचं असणार आहे. नवलखा आर्ट्स आणि होली बेसिल प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या सिनेमांचे विशेष म्हणजे आज पर्यंत ९ सिनेमांपैकी ७ दिग्दर्शकांना पदार्पणातील सिनेमा करायची संधी नवलखा आर्ट्स आणि होली बेसिल प्रॉडक्शन हाउसने दिली आहे. 'शाळा'चे सुजय डहाके, सिद्धांतचे विवेक वाघ,  'फॅंड्री'चे नागराज मंजुळे हि नावे प्रामुख्याने घेता येईल. 'राक्षस' हा सिनेमा शूट होण्याआधीच सिनेमाची कथा जगातील प्रसिद्ध आणि नामांकित दृश्यम संडन्स रायटर्स लॅबमध्ये निवड झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर राक्षसची चर्चा आधीपासून आहे. येत्या काही दिवसात तो आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजेल याबद्दल संपूर्ण  खात्री नवलखा आर्ट्स आणि होली बेसिल प्रॉडक्शनला आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

"धुरंधर" मधील अक्षय खन्नाच्या अभिनयाने अमिषा पटेल प्रभावित झाली, म्हणाली...

अक्षय खन्नाने लग्न का केले नाही? लग्नच करायचं नाही हे ठरवण्यामागील कारण आहे तरी काय?

एपिक सिनेमा आकार घेता आहे: तमन्ना भाटिया दूरदर्शी दिग्गज वी. शांताराम यांच्या भव्य बायोपिकचा भाग; पडद्यावर साकारतील ‘जयश्री’

प्रसिद्ध गुजराती अभिनेता श्रुहद गोस्वामी यांची 'क्यूंकि सास भी कभी बहू थी' मालिकेत खास एंट्री!

अभिनेत्री अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातून मल्याळम सुपरस्टार दिलीपची निर्दोष मुक्तता

सर्व पहा

नवीन

मल्याळम अभिनेता अखिल विश्वनाथ यांची गळफास घेऊन आत्महत्या

6 वर्षांच्या डेटिंगनंतर अर्जुन रामपालने प्रेयसी गॅब्रिएला डेमेट्रिएड्स शी साखरपुडा केला

घोड्याच्या नालसारखा आकार आणि बदलत्या रंगांसाठी प्रसिद्ध चित्रकूट धबधबा

75व्या वाढदिवसानंतर, रजनीकांत कुटुंबासह तिरुपतीला पोहोचले

सलमान खान २५ वर्षांपासून बाहेर डिनरला गेला नाही, व्यस्त वेळापत्रकामागील वेदना उघड केल्या

Show comments