Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'वृंदावन'च्या ट्रेलरची सोशल मिडीयावर धूम

Webdunia
मंगळवार, 5 जानेवारी 2016 (16:11 IST)
रोमान्स, कॉमेडी आणि भन्नाट अॅक्शनचा भरपूर मसाला असलेल्या 'वृंदावन' सिनेमाचा ट्रेलर सोशल मिडीयावर दाखल झाल्यापासून  तुफान गाजत आहे. मराठी चित्रपटातील मल्टीस्टार 'वृंदावन' सिनेमात दिसणार आहेत. साउथ इंडियन म्युजिकचा अस्सल तडका आणि हिंदीतील चार्मिंग अभिनेता राकेश बापट पहिल्यांदाच धडाकेबाज अॅक्शन सीन देताना दिसेल. 'वृंदावन' सिनेमाच्या ट्रेलरची अधिक रंगत वाढलीय ती अभिनेत्री पूजा सावंत आणि वैदही परशूरामी यांच्या मोहक अदांमुळे. या नायिकेंचा राकेश बापटसोबतचा रोमान्स ट्रेलरमध्ये बहर आली आहे.

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेता  अशोक सराफ, महेश मांजरेकर, मोहन जोशी, शरद पोंक्षे, उदय टिकेकर, भारत गणेशपुरे या दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी देखील या सिनेमात आहे. एक नायक, दोन नायिका आणि खलनायक असा एंटरटेनमेंटचा भन्नाट फॉर्म्युला असेलला वृंदावन सिनेमा अनेक मोठ्या आणि भव्य ठिकाणी चित्रित करण्यात आला आहे.

पनवेल येथील आयुष रीसॉर्ट लोकेशन ट्रेलरमध्ये पाहताना आपसूक भुवया उंचावत आहेत.  एकंदरीतच प्रेमाचा त्रिकोण असलेला 'वृंदावन' सिनेमा प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा ठरेल यात शंका नाही. आजवर प्रादेशिक भाषेत काम करणारे टीलव्ही प्रसाद यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले असून राजप्रेमी, संदीप शर्मा, सुनील खांद्पूर या त्रिकुटांची 'रिअलस्टिक फिल्म कंपनीने' सिनेमाची निर्मिती केली असून अमित आणि अनघा कारखानीस या सिनेमाचे सहनिर्माते आहेत. कोरियोग्राफर गणेश आचार्य यांच्या तालावर सिनेमातील कलाकार थिरकले आहेत. संगीत दिग्दर्शक अमितराज यांनी सिनेमाला संगीत दिलं आहे. मल्टीस्टार आणि एंटरटेनमेंटचा कम्प्लीट पॅकेज असलेला 'वृंदावन' सिनेमा ५ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी

Show comments