Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'निवडणुकीत जागावाटपाचा निर्णय फडणवीस घेतील', केंद्रीय मंत्रीं भाजपच्या बैठकीला हजर

Webdunia
सोमवार, 12 ऑगस्ट 2024 (09:38 IST)
महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत जागावाटपाबाबत आणि मित्रपक्षांशी चर्चा करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील, असे महाराष्ट्र भाजपने म्हटले आहे. योग्यवेळी उमेदवारांची घोषणा केली जाईल, असे पक्षाने सांगितले आहे. 
 
तसेच राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जागावाटपाचा निर्णय घेतील आणि मित्रपक्षांशी चर्चा करतील, असे भाजपने रविवारी जाहीर केले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार भाजपचे मुंबई युनिटचे प्रमुख आशिष शेलार म्हणाले की, "फडणवीस यांच्याकडे जागा वाटप आणि विधानसभा मतदारसंघ निवडीचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार सोपवण्यासाठी मुंबईत कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली होती." काही महिन्यांवर आल्या विधानसभा निवडणुकांनासाठी तयारी करणे हा त्यामागचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.
 
आर्थिक राजधानी मुंबईत झालेल्या या बैठकीला पक्षाचे निरीक्षक आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, केंद्रीय मंत्री आणि मुंबई उत्तरचे खासदार पियुष गोयल हेही उपस्थित होते. महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 288 पैकी 104 जागा जिंकल्या होत्या.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

नंदुरबार: आफ्रिकन स्वाइन फ्लू रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात डुकरांना मारण्याचे आदेश

धुळ्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा गूढ मृत्यू, पोलीस तपासात गुंतले

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भूमिगत मेट्रो सुरू होणार

महाराष्ट्रात तिसरी युतीची शक्यता, या नेत्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न, MVA आणि महायुतीमधील तणाव वाढणार

भंडारा: गणेश विसर्जन मिरवणुकीत छत कोसळले, 30 हून अधिक महिला जखमी

पुढील लेख
Show comments