Festival Posters

महाराष्ट्र बिहारच्या इतिहासाची पुनरावृत्ती करणार? मुख्यमंत्रीपदावर शिंदे की फडणवीस की अजित पवार

Webdunia
शनिवार, 23 नोव्हेंबर 2024 (13:51 IST)
Maharashtra Assembly Results : महाराष्ट्रात बंपर विजयाकडे वाटचाल करणाऱ्या महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदाबाबतची चर्चा तीव्र झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी आले आहे. महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या निवडणुकीच्या ट्रेंडमध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीला पूर्ण बहुमत मिळताना दिसत आहे. संभाव्य विजयाच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्येही मुख्यमंत्रीपदाची शर्यत सुरू झाली आहे. आता महाराष्ट्रात बिहारच्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार की भाजप आपला मुख्यमंत्री करणार हे पाहावे लागेल.
 
महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळाल्यास मुख्यमंत्रीपदासाठी तीन मोठी नावे पुढे येत आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला स्वतःचा मुख्यमंत्री बनवायचा आहे. भाजपकडून विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर आहे. शिवसेनेच्या चांगल्या कामगिरीनंतर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. दुसरीकडे, महाआघाडीचा भाग असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याची चर्चा केली आहे.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

संसदेत वंदे मातरम वर १० तासांची चर्चा होणार; पंतप्रधान मोदी लोकसभेत आणि अमित शाह राज्यसभेत करतील सुरवात

नागपुरातील गडकरी जनता दरबारात मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थित; अपंगांनी व्यक्त केली कृतज्ञता

Maharashtra Winter Session नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू; प्रत्येक मुद्द्यावर होणार चर्चा

Winter Session सरकार १८ विधेयके मांडणार, फडणवीस यांनी विरोधकांच्या बहिष्काराला प्रत्युत्तर दिले

LIVE: महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे; सरकार १८ विधेयके मांडणार

पुढील लेख
Show comments