Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पांडव लेणी नाशिक

पांडव लेणी नाशिक
Webdunia
मंगळवार, 17 सप्टेंबर 2024 (07:00 IST)
महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला जिल्हा आहे. नाशिक मध्ये नैसर्गिक सौंदर्य तर आहेच पण बरोबर अनेक प्राचीन मंदिरे त्यांचा इतिहास तसेच पर्वतरांगा यामुळे नाशिक जिल्हा हा आशिया खंडात पर्यटनासाठी महत्वाचा मानला जातो. 
 
तसेच नाशिक जिल्ह्यात पांडव लेणी म्हणून एक पर्यटन स्थळ आहे जे पांडव कालीन गुहा या नावाने देखील प्रसिद्ध आहे. तसेच त्रिरश्मी गुहा नावाने ओळखल्या जाणाऱ्या या प्राचीन गुफा यांचा इतिहास हा खूप प्राचीन मनाला जातो. आख्यायिकेनुसार या गुफांचे नाव महाभारतातील राजकुमार पांडव यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. म्हणून यांना पांडव लेणी या नावाने देखील ओळखले जाते. पांडवांनी आपल्या वनवासादरम्यान मोठे मोठे दगड फोडून त्यांमध्ये गुहा बनवून ते विश्रांती घ्यायचे. आपल्या ऐतिहासिक आणिस्थापत्य शैलीसाठी प्रसिद्ध या लेण्या पर्यटकांना आकर्षित करतात. दरवर्षी हजारोच्या संख्येने पर्यटक इथे पर्यटनासाठी येतात. 
 
इतिहास-
नाशिक शहरापासून या लेणी काही अंतरावर आहे. तसेच याठिकाणी शांत आणि निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव होतो. पांडव लेणी गुहा या डोंगरावर स्थित आहे. जो डोंगर घनदाट झाडांनी घेरलेला आहे. जे पांडव लेणीच्या सौंदर्यात भर घालते. हे स्थान शांतीपूर्ण वातावरण प्रदान करते. पांडव लेणी गुफांचे निर्माण बौद्ध भिक्षुंव्दारा करण्यात आले आहे. या शांत वातावरणात त्यांनी शांती आणि ज्ञान प्राप्त केले व इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकातील ते हीनयान बौद्ध पंथाचे होते. तसेच सातवाहन राजवटीच्या काळात हे बेसाल्टिक खडकात कोरलेले होते.
 
या गुहेमध्ये प्रवेश केल्यानंतर भक्कम दगडावर कोरली गेलेली वास्तुकलाचे चमत्कार पाहून आश्चर्यचकित व्हायला होते. तसेच गुहेच्या भिंतीवरील कोरीवकाम, सुंदर शिल्पे आणि प्राचीन शिलालेख भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा जपताना दिसतात. तसेच पांडवलेणीमध्ये एकूण 24लेणी आहे, त्यापैकी गुहा 3, गुहा 10 आणि गुहा 18सर्वात उल्लेखनीय आहे. कारण त्यांमध्ये कोरीवकाम, शिल्पे आणि अलंकृत खांब आहे, सर्व काही दगडात कोरलेले आहे. मुख्य गुहा, गुहा 3, सर्वात मोठी आणि सर्वात विस्तृत आहे, तसेच ज्यामध्ये प्रार्थना हॉल आणि अनेक कक्ष आहेत. तसेच त्यामध्ये मोठा स्तूप आणि अनेक सुंदर कोरीव मूर्ती देखील आहे.तसेच या गुहा भारतीय प्राचीन वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे. या गुहा बौद्ध मठ म्हणून देखील प्रचलित आहे. भिक्षुकांव्दारा ध्यान, अध्ययन आणि राहण्यासाठी या गुहांचा उपयोग केला जायचा. तसेच या गुहा बौद्ध कला आणि वास्तुकलेचा प्रभाव दर्शवते. आपल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व याशिवाय पांडवलेणी पिकनिककरिता देखील एक शांतीपूर्ण वातावरण प्रदान करते. तसेच पांडवलेणी येथे ट्रॅकिंगचा देखील अनुभव घेता येतो.  
 
पांडव लेणी नाशिक जावे कसे?  
विमान मार्ग-
जवळच ओझर नाशिक आंतराष्ट्रीय विमानतळ आहे जे शहरापासून कमीतकमी 24 किमी अंतरावर आहे. विमानतळावरून तुम्ही कॅब किंवा खाजगी वाहनाच्या मदतीने पांडव लेणी पर्यंत पोहचू शकतात.
 
रेल्वे मार्ग- 
पांडव लेणी पासून नाशिक रोड रेल्वे स्टेशन 10 किमी अंतरावर आहे. स्टेशनवरून रिक्षा किंवा कॅब च्या मदतीने लेणी पर्यंत सहज पोहचता येते. 
 
रस्ता मार्ग-
नाशिक शहरातील मार्ग अनेक शहरांना जोडलेलाआहे. तसेच पांडव लेणी मुंबई आग्रा राष्ट्रीय राजमार्गाच्या कडेला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्टेजवर ढसाढसा रडली नेहा कक्कर, चाहत्यांनी दिली प्रतिक्रिया

अक्षय कुमारच्या केसरी 2 चा टीझर प्रदर्शित, जालियनवाला बाग हत्याकांडाची कहाणी दाखवली जाणार

इमरान हाश्मीची पत्नी परवीन त्याला तिच्यासाठी अनलकी मानते, कारण जाणून घ्या

कंगना राणौतला तिचे वडील डॉक्टर बनवू इच्छित होते, ती बनली बॉलिवूडची क्वीन

चंदू चॅम्पियनसाठी कार्तिक आर्यन महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित

सर्व पहा

नवीन

तारक मेहता मध्ये अखेर दयाबेन परत येतीये?

सैफअलीखान हल्ल्याच्या प्रकरणाला नवे वळण, आरोपीने मुंबई सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला

अजय देवगणच्या 'रेड 2' चा टीझर प्रदर्शित,आयकर अधिकारी अमय पटनायकच्या भूमिकेत दिसणार

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

रेसिपी आणि मजेशीर कंमेंट्स

पुढील लेख
Show comments