Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नवेगाव बांध अभयारण्य

Webdunia
शनिवार, 8 ऑगस्ट 2015 (13:31 IST)
नवेगाव येथील अभयारण्यात दरवर्षी जगभरातील स्थलांतरित पक्षी भेट देतात. संपूर्ण महाराष्ट्रात आढळणार्‍या पक्ष्यांच्या प्रजातींपैकी निम्म्याहून अधिक प्रजाती नवेगाव बांध परिसरात आढळतात. नवेगावच्या हिरव्यागार टेकडय़ांङ्कध्ये हा भाग वसलेला आहे. आपली दुर्बीण घेऊन तलावाच्या नजीक असलेल्या मनोर्‍यावर टेहळणी करतायेते. सभोवतालचा परिसर न्याहाळत, विविध पक्ष्यांचे निरीक्षण करताना वेळ कसा निघून जातो ते कळत नाही. पक्ष्यांच्या हालचाली, सवयी, वैशिष्टय़े टिपत नोंदी घेता येतात. जराही खळबळ केली की चाहूल लागून प्राण्यांनी पळ काढलाच म्हणून समजा.

हे दुर्मीळ क्षण कॅमेर्‍यात टिपल्यास आठवणींच्या देशात कधीही जाता येते. या तलावास एकीकडून मोठी भिंत बांधण्यात आली आहे. भिंतीच्या पलीकडे बघितल्यास प्रचंड जलाशयाचा साठा दृष्टीस पडतो. क्षितिजापर्यंत निळेशार पाणी धरणास सभोवताली टेकडय़ांनी वेढले असून, हिरव्यागार वनश्रीने त्या नटलेल्या आहेत. येथील जंगलात अस्वल, सांबर, चितळ, चित्ता यासारखे प्राणी आढळतात. प्रसिद्ध पक्षितज्ज्ञ डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य, हरणांचा पार्क व सुंदर बगिचे येथे आहेत. अभयारण्यात रात्रीचा प्रवेश दिला जात नाही, तेव्हा सकाळीच जाणे उत्तम. सगळीकडे हिरवाईने नटलेल्या टेकडय़ांच्या मध्यभागी शांत निळय़ाशार पाण्यावरुन वाहणारा थंडगार वार्‍याचा स्पर्श अनुभवत वल्हवत राहाणे यासारखे सुख नाही. नवेगाव बांध येथे जाण्यासाठी विमानाने जवळच्याच नागपूर विमानतळावर उतरावे लागते. तेथून हे अभयारण्य 150 कि.मी. अंतरावर आहे. रेल्वेने जायचे झाल्यास देऊळगाव रेल्वेस्टेशन येथून अवघ्या दोन कि. मी. अंतरावर हे अभयारण्य आहे. तसेच नवेगावपासून हे अभयारण्य 10 कि. मी. अंतरावर आहे.
 
मृणाल सावंत 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

पुष्करचा यंदाचा वाढदिवस ठरणार 'खास',आज्जीबाई जोरात’ नाटकाद्वारे पुष्कर गाठणार वेगळी ‘उंची’

रणवीर सिंगच्या डिपफेक व्हिडिओप्रकरणी अपडेट, आरोपींना नोटीस

'छावा' च्या सेटवरुन लीक झाला विकी कौशलचा लुक, छत्रपती संभाजी महाराजांच्या अवतारात दिसले

सलमान खान प्रकरणात नवा ट्विस्ट, मुंबई पोलिसांनी तापी नदीतून दोन पिस्तूल आणि गोळ्या जप्त केल्या

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

Show comments