Dharma Sangrah

शिवरात्रीचे व्रत कसे करावे?

Webdunia
शिवरात्रीचे व्रत फाल्गुन कृष्ण त्रयोदशीला करतात. काही जण चतुर्थीच्या दिवशी हे व्रत करतात. सृष्ट्रीच्या प्रारंभी याच दिवशी मध्यरात्री शंकराचे, ब्रह्माच्या रूपातून रुद्राच्या रूपात अवतरण झाले होते. प्रलयाच्या काळात याच दिवशी प्रदोषाच्या वेळी परमेश्वर शिवाने तांडव करीत ब्रह्मांडाला तिसर्‍या नेत्राच्या ज्वाळेतून भस्म केले. त्यामुळे त्या रात्रीला महाशिवरात्री किंवा कालरात्री असेही म्हटले जाते.

शीलवती गौरी ही अर्धांगिनी असणारे शिव प्रेत-पिशाच्च यांच्याच सानिध्यात राहतात. त्यांचे रूपही या वातावरणाला शोभेल असे आहे. शरीराला भस्म, गळ्यात सापाचा हार, जटेमध्ये पावन गंगा, मस्तकावर प्रलयकारी ज्वाला आणि वाहन नंदी असे शिवाचे रूप आहे.

महादेवांच्या या व्रताचे विशेष महत्त्व आहे. हे व्रत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, पुरूष-स्त्री, बालक-वृद्ध प्रत्येकजण करू शकतो.

व्रत-पूजन कसे करावे....
* या दिवशी भल्या पहाटेच स्नान-ध्यान आटोपून उपवास धरावा.
* फूल-पत्री तसेच सुंदर वस्त्रांनी मंडप तयार करून कलशाची स्थापना करावी आणि त्यासोबतच गौरी-शंकर आणि नंदीची मूर्ती ठेवावी.
* या मूर्ती शक्य नसतील तर माती घेऊन त्याचे शिवलिंग बनवावे.
* कलश पाण्याने भरून तांदूळ, पान, सुपारी, लवंग, वेलची, चंदन, दूध, दही, तूप, मध, कमलगट्टा, धोतर्‍याचे फूल, बेल, यांचा प्रसाद शंकराला अर्पण करून पूजा करावी.
* रात्री जागरण करून शिवाची स्तुती करावी. महाशिवरात्रीला शिवपुराण पठण फायदेशीर ठरते. शिवआराधना स्तोत्रांचे वाचनही लाभदायक असते.
* या जागरणात शिवशंकराच्या चार आरती म्हणणे गरजेचे आहे.
* या दिवशी शिवरात्रीची कथा सांगा किंवा ऐका.
* दुसर्‍या दिवशी तीळ-खीर तसेच बेलपत्रांचे हवन करून ब्राह्मण भोजन घालावे. हा विधी पवित्र भाव ठेवून केल्यास शंकर प्रसन्न होऊन भक्ताला अपार सुख देतात.
* शंकराला अर्पण केलेला नैवेद्य खाणे वर्ज्य आहे. हा नैवेद्य खाल्ल्याने खाणार्‍याला, नरकातील दु:ख भोगावे लागते. या कष्टाचे निवारण करण्यासाठी शिवाच्या मूर्तीजवळ शाळीग्रामाची मूर्ती अनिवार्य आहे. जर शिवाच्या मूर्तीजवळ शाळीग्राम असल्यास नैवेद्य खाण्याचा दोष राहत नाही.
सर्व पहा

नवीन

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

६ जानेवारी रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी, व्रत- पूजा विधी आणि महत्तव जाणून घ्या

रविवारी करा आरती सूर्याची

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

Shattila Ekadashi 2026 षटतिला एकादशी व्रत कधी पाळले जाईल?

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

पुढील लेख
Show comments