Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गांधींनी लिहिलेली पुस्तके

Webdunia
सोमवार, 28 जानेवारी 2019 (13:20 IST)
महात्मा गांधींनी विपुल लेखन केले आहे. अनेक दशके त्यांनी बऱ्याच वर्तमानपत्रांचे संपादन केले. यामध्ये गुजराती, हिंदी आणि इंग्रजीमधील हरिजन, दक्षिण आफ्रिकेमध्ये असतांना इंडियन ओपिनियन आणि भारतात परत आल्यावर इंग्रजीमधील यंग इंडिया, गुजराती मासिक नवजीवन यांचा समावेश आहे. नंतर नवजीवन हिंदीमधून पण प्रकाशित केले गेले. या बरोबरच, ते जवळपास प्रत्येक दिवशी अनेक वर्तमानपत्रांना आणि व्यक्तींना पत्रे लिहीत असत.
 
गांधींनी काही पुस्तके सुद्धा लिहिली आहेत. त्यांचे आत्मचरित्र माझे सत्याचे प्रयोग या नावाखाली प्रकाशित झाले आहे. त्यांच्या दक्षिण आफ्रिकेतील संघर्षावर त्यांनी "Satyagraha in South Africa (दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रह)" हे पुस्तक लिहिले आहे. तसेच त्यांनी "हिंद स्वराज" किंवा "Indian Home" ही राजकीय पुस्तिका लिहिली आहे आणि जॉन रस्किनच्या "Unto This Last" चे गुजराती भाषांतर केले आहे.[२२] हा शेवटचा लेख त्यांच्या अर्थशास्त्रावरील विचारसरणीचे वर्णन करतो. त्यांनी शाकाहार, आहार आणि स्वास्थ्य, धर्म, सामाजिक परिवर्तन इत्यादी विषयांवरसुद्धा विपुल लेखन केले आहे. ते सामान्यतः गुजराथीमध्ये लिखाण करत, पण त्यांच्या पुस्तकांच्या हिंदी आणि इंग्रजी भाषांतरांचे परीक्षणसुद्धा ते करत असत.
 
गांधींचे पूर्ण लेखन भारत सरकारने "संकलित महात्मा गांधी" (The Collected Works of Mahatma Gandhi) या नावाखाली १९६०च्या दशकात प्रकाशित केले आहे. यामध्ये जवळपास १०० खंड व त्यांची ५०,००० पृष्ठसंख्या आहेत. इ.स. २००० मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधित आवृत्तीवरून अनेक वाद झाले होते. सरकारने राजकीय फायद्यासाठी त्यात बदल केले आहेत असा आरोप गांधींच्या अनुयायांनी केला होता.[२३]
 
गांधींनी लिहिलेली पुस्तके
Indian Home Rule (हिंद स्वराज्य)
गांधीजींची संक्षिप्त आत्मकथा
गांधीजीचे जीवन त्यांच्याच शब्दांत
गांधी विचार दर्शन : अहिंसाविचार
गांधी विचार दर्शन : राजकारण
गांधी विचार दर्षन : सत्याग्रह प्रयोग
गांधी विचार दर्शन : सत्याग्रह विचार
गांधी विचार दर्शन : सत्याग्रहाची जन्मकथा
गांधी विचार दर्शन : हरिजन
नैतिक धर्म
माझ्या स्वप्नांचा भारत

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: पक्षाची स्थिती

लंडनमधील अमेरिकन दूतावासाबाहेर मोठा स्फोट

LIVE: महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळाल्यास मुख्यमंत्रीपदासाठी तीन मोठी नावे पुढे

महाराष्ट्र बिहारच्या इतिहासाची पुनरावृत्ती करणार? मुख्यमंत्रीपदावर शिंदे किंवा फडणवीस किंवा अजित पवार

Maharashtra Election Result : एकनाथ शिंदेंनी प्रिय बहिणींचे आभार मानले

पुढील लेख
Show comments