Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गांधीजींना पूजणारे गाव

Webdunia
PR
PR
ओरिसातील संबलपूर जिल्ह्यात भतरा गावाला राष्ट्रपिता महात्मा गांधींविषयी अतिशय प्रेम आहे. कारण या गावात महात्मा गांधींचे मंदिर आहे. विशेष, म्हणजे येते गांधीजींची कांस्य मूर्ती सिद्धासन अवस्थेत आहे. या मूर्तीची रोज पूजाअर्चना केली जाते. सकाळ-संध्याकाळ आरती होते. प्रसाद वाहिला जातो. येथील स्थानिक लोक गांधीजींचे दर्शन केल्यानंतरच आपल्या रोजच्या कामाची सुरुवात करतात.

या मंदिराची कल्पना माजी आमदार अभिमन्यू कुमार यांना सुचली. ते रेढाखोल विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी सन 1971 मध्ये या मंदिराची निर्मिती केली. 11 मीटर लांब व साडेसहा मीटरहून रूंद आणि 12 मीटर उंच या मंदिराला पूर्ण करण्यासाठी 3 वर्षे लागली.यात एक मीटरपेक्षा जास्त उंचीची गांधीजींची मूर्ती येथील स्थानिक कला महाविद्यालयाच्या कलाकाराने तयार केली आहे.

26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि 2 ऑक्टोबरला येथे विशेष पूजेचा कार्यक्रम होतो. आजूबाजूच्या गावातील लोक पूजेसाठी येतात. दुसर्‍या मंदिराच्या परिसरात जेथे गरूड किंवा एखादा स्तंभ असतो. तसाच या मंदिराच्या परिसरात अशोक स्तंभ आहे. मंदिरात भारतमातेची प्रतिमा आहे तिच्या हातात अशोक स्तंभ आहे. किमान दीड हजार लोकसंख्या असलेले हे गाव देशभरात या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

सर्व पहा

नवीन

जालना येथे भीषण अपघात, कार उभ्या ट्रकला धडकली, कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर 11 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, गडचिरोली जिल्ह्याला वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही भेट

मंत्र्यांना या बंगल्यात राहण्याची भीती वाटते, बंगला कोणाला मिळेल? समर्थकांमध्ये भीतीचे वातावरण

पुण्यातील भीमा कोरेगाव येथे आज युद्धाचा 207 वा वर्धापन दिन साजरा होतोय

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी नवीन वर्षाची सुरुवात 'रक्तदान - श्रेष्ठदान'ने केली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शुभेच्छा दिल्या

Show comments