Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

येवल्यातील पतंगोत्सव

वेबदुनिया
' डट्टा, अंग, फडकीचा घाट, गोंडं, मत्स्य, डोळे, कल्लेदार, आसारी....' काही तरी विचित्र वाचतोय, असं वाटतयं ना! पण तुम्ही वाचताय हे शब्द मराठीच आहेत. ते इतरात्र बोलले जात नसले, तरी नाशिकजवळच्या येवल्यात मात्र सराईतपणे बोलले जातात. अर्थात येवल्याची भाषा तुमच्या-माझ्यासारखीच मराठी असली, तरी 'या बाबतीत' ती थोडी वेगळीच आहे. ही भाषा आहे पतंगासंदर्भातली. पतंग इतरत्रही उडविले जात असले, तरी येवल्याची परंपरा काही खाच आहे. ती तेथे गेल्यावरच कळू शकेल आणि या शब्दांचा अर्थही कळेल. दरवर्षीच्या मकरसंक्रांतीबरोबरच येवल्यात पतंगोत्सव साजरा होत असतो. या दोन दिवसांत संपूर्ण येवला जमिनीवर नसतंच, (लाक्षणिक अर्थानं) ते असतं धाब्यांवर. अर्थात घराच्या गच्च्यांवर, कौलांवर, पत्र्यांवर. गावातले व्यवहारही अपवाद वगळता बंद असतात. जणू अघोषित बंदच असतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपलं वय विसरून सारे जण पतंग उडविण्यात मग्न असतात. वेळेचं, भुकेचं भान कोणालाही उरलेलं नसतं. ढोलताशा, हलकडीच्या तालावर आणि लाऊड स्पीकरच्या ठणाणत्या आवाजात धुंद होऊन येवलेकर पतंग खेळत असतात. ' य~~~~ काटे'च्या आवाजाने आणि दुसर्‍याच्या काटलेल्या पतंगाच्या आनंदाने त्यांचं मन पतंगाप्रमाणे वर गिरक्या घेत असतं.

येवलेकरांचं पतंगाचं हे वेड तसं फार जुनं आहे. त्याची परंपरा सांगताना व्यंगचित्रकार व येथील ज्येष्ठ नागरिक प्रभाकर झळके म्हणाले, की पतंगोत्सवाच्या जन्मकथेनं येवल्याच्या जन्माबरोबरच आकार घेण्यास सुरवात केली. जवळपास अडीचशे ते तीनशे वर्षांपूर्वी रघुजीबाबा पाटील या सरदारांनी हे गाव वसवलं. गावाच्या विकासासाठी त्यांना विविध व्यवसायांनाही उत्तेजन दिले. विणकरांनाही त्यांनी इथं बोलावून आणलं. त्यांनतर गुजराती समाजालाही इथं आणलं. गुजरातमध्ये पतंगांना मोठे महत्त्व नि परंपराही आहे. या कुटुंबांनी येवल्यात येताना आपला पारंपरिक पतंगोत्सवही आणला नसता तरच नवल! त्यामुळे गुजरातच्या मातीत फुललेला पतंगोत्सव इथंही बहरला. या उत्सवात स्थानिकांनीही तितकाच उत्साहजनक सहभाग घेतल्यानं तो अधिकाधिक लोकप्रिय झाला. त्याची लोकप्रियता पतंगाप्रमाणेच आभाळापर्यंत जाऊव पोहोचली. त्यामुळेच 'येवल्यातील मुलांना पतंग उडवायला शिकवावं लागत नाही,' असे म्हटले जाते ते खोटे नाही. 

येथील पतंगोत्वसाची काही वैशिष्टंही आहते. ती पतंगात, मांजात, आसारीत आणि ती उडविण्यातही आहेत. पतंग तयार करण्याची त्यांची धाटणीदेखील 'हटके' आहे. येवल्यात पतंग घ्यायचा तर आधींचा, पावणाचा, सव्वाचा किती 'फडकी'चा घ्यायचा. ते सांगावे लागते आता हे फडकी काय प्रकरण आहे. ते चटकन कळणार नाही. फडकी म्हणजे पतंग तयार करण्याचा कागद. अर्धी फडकी म्हणजे सर्वांत लहान पतंग तयार करण्यासाठी लागणार्‍या कागदाचं प्रमाण. या फडकीचं प्रमाण वाढवाल तसा त्याचा आकार वाढत जातो. डट्टा म्हणजे पतंगाच्या मध्ये वापरण्यात येणारी काडी. कमान म्हणजे पतंगाच्या मध्ये वाकवलेली काडी. हे सगळं खळीच्या सहाय्यानं पतंगाला चिकटवायचं. त्याला काळी शेपटी लावतात. त्याला गोंडा म्हणतात. पतंगाच्या डट्ट्याच्या दोन्ही बाजूंना दोन ठिपके काढले, की ते डोळे होतात. त्याची शेपटी माशासारखी केली, की तिला म्हणतात 'मत्स्य'. पतंगासाठी साध्या कागदाप्रमाणे बेगडीचाही वापर करतात. याशिवाय तो सजविण्यासाठी रंगांचा किंवा चमकीचाही वापर केला जातो.
सर्व पहा

नवीन

शनिवारी हे 5 मंत्र जपा, शनीची कृपादृष्टी मिळवा

Lakshmi Puja शुक्रवारी लक्ष्मीजींना करा प्रसन्न, पैशाची कमतरता दूर होईल, सुख-समृद्धी येईल

आरती शुक्रवारची

।। श्री दत्तगुरूंची आरती ।।

आरती गुरुवारची

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

Show comments