rashifal-2026

मंगळ देवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकात दिसले प्रामाणिकपणाचे दर्शन

Webdunia
बुधवार, 25 जानेवारी 2023 (20:02 IST)
हरविलेली मौल्यवान वस्तूची पर्स केली परत
अमळनेर : येथील मंगळग्रह मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकाची मंगळवारी दुपारी मौल्यवान वस्तू असलेली पर्स जळगाव येथील भाविकाला सापडली. मनात कोणतेही लालसा न ठेवता प्रामाणिकपणे पर्स आणून दिल्याने त्या भाविकाचे कौतुक कऱण्यात येत होते.
 
मंगलदोषच्या अभिषेक, पूजा व दर्शनासाठी अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मंगळवारी अमळनेर येथील महिला भाविक सुवर्णा पाटील यांची नजरचुकीत पर्स मंदिर परिसरात हरविली. या पर्समध्ये बँकेचे एटीएम, घराच्या चॉबी, काही मौल्यवान दागिने व महत्वाचे कागदपत्रे होते. पर्स हरविल्याबाबत सुवर्णा पाटील यांच्या लक्षात येताच. त्या खूप घाबरल्या. सदर पर्स बेवारस पडल्याचे जळगाव येथील रामचंद्र पोतदार यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ मंगळ ग्रह मंदिराच्या चौकशी कक्षाशी संपर्क  साधून सदर पर्स मंदिर प्रसासनाकडे सोपवली. पर्स हरविल्याबाबत आवाहन करण्यात आल्यानंतर सुवर्णा पाटील रामचंद्र पोतदार यांच्या हस्ते पर्स सोपविण्यात आली.  
 
सौ. पाटील यांना पर्स परत मिळाल्याने मंदिर प्रशासन व रामचंद्र पोतदार यांचे आभार मानले. पोतदार यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे दिवसभर भाविकांकडून कौतुक करण्यात येत होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज बोधवचने

रविवारी करा आरती सूर्याची

Surya Dev Mantra रविवारी सूर्यदेवाच्या 10 शक्तिशाली मंत्रांचा जप करा, जीवनातील सर्व समस्या नाहीश्या होतील

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची आरती

जगन्नाथ मंदिराच्या घुमटावर पक्ष्यांचा थवा, याचा अर्थ काय, अपघाताची आशंका ?

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

पुढील लेख
Show comments