अमळनेर : दरवर्षाप्रमाणे यंदाही मकर संक्रांतीचे औचित्य साधून मंगळग्रह सेवा संस्था व कोंडाजी व्यायाम शाळा पैलाड यांच्या संयुक्त विद्यमाने येथे भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली होती.
या दंगलीत भैय्या पहिलवान चाळीसगाव, सागर पहेलवान येवला, संदीप पहिलवान गोंडगाव, संदीप पहिलवान धरणगाव, पवन पहिलवान अमळनेर, कल्पेश विसावे धरणगाव या कुस्तीविरांनी विजयश्री मिळवली. या दंगलीत चाळीसगाव, धुळे, मालेगाव, धरणगाव,कासोदा,भुसावळ, येवला, कन्नड, नंदुरबार आदी जिल्ह्यातून पहिलवानांनी सहभाग नोंदविला होता.
विजयी पैलवानांना बक्षीस स्वरूपात भांडी व १०० ते ५००० हजार रुपयांपर्यंत रोख पारितोषिक देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अनिल पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, पोलीस निरीक्षक विजय शिंदे,बबलू पाठक, सुरेश पाटील, के.डी.पाटील, प्रताप शिंपी, डॉ. शरद पाटील, पोलीस उपनिरीक्षक नरसिंह वाघ, शब्बीर पहेलवान, रावसाहेब पैलवान बाळू पाटील, भरत पवार, ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते. राजू पैलवान, विठ्ठल पहिलवान पंच होते.