Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चैत्र नवरात्रीनिमित्त मंगळग्रह मंदिरात नवचंडी महायाग

Webdunia
बुधवार, 29 मार्च 2023 (23:50 IST)
चैत्र नवरात्रीनिमित्त मंगळग्रह मंदिरात  नवचंडी महायाग 
आठ जोडप्यांचा सहभाग; भाविकांची अलोट गर्दी 

अमळनेर: येथील श्री मंगळग्रह मंदिरात चैत्र नवरात्रीनिमित्ताने  दुर्गाष्टमीचे औचित्य साधून  २९ मार्च रोजी नवचंडी महायाग झाला. सकाळी ९ ते दुपारी १२ व दुपारी २ ते सायंकाळी ५ या दोन सत्रांत अतिशय भक्तिमय वातावरणात अनेक भाविकांच्या साक्षीने पार पडलेल्या या महायागाचे विविध क्षेत्रातील ८ यजमान होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय पवार मुख्य यजमान होते. 
 
राज्यात असलेल्या देवीच्या साडेतीन शक्तिपीठांची व विश्वातील एकमेव असलेल्या भूमीमातेच्या प्रतिमेची आरास भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. यावेळी श्री गणपती पुण्यवाचन, मातृकापूजन, नांदी श्राद्ध, आचार्य पूजन, वास्तुपूजन, योगिनी पूजन, सर्वतोभद्र मंडल पूजन, क्षेत्रपाल पूजन, चतुषश्ट भैरव पूजन, नवग्रह पूजन, ईशान्य रुद्रकलश पूजा, दुर्गा सप्तशती पाठांचे हवन, स्थापित देवतांचे हवन, बलिदान, पूर्णाहुती  करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता महाआरती झाली. 
पूजेसाठी निवृत्त प्राचार्य डॉ. एम. बी.चव्हाण,
भाजपचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, माजी नगरसेवक विक्रांत पाटील  , ज्ञानवर्धिनी क्लासेसचे संचालक शिरीष डहाळे , निवृत्त पर्यवेक्षक आर. पी. नवसारीकर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष प्रवीण सपकाळे , विश्व हिंदू परिषदेचे तालुकाध्यक्ष संजय विसपुते यजमान  होते. मंदिराचे पुजारी प्रसाद भंडारी, तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य, मंदार कुलकर्णी, अक्षय जोशी, नरेंद्र उपासनी,हेमंत गोसावी यांनी पौरोहित्य केले. वादक अंकुश जोशी व चंद्रकांत जोशी यांनी त्यांची साथसंगत केली.
 
मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, जयश्री साबे यांच्यासह सेवेकरी विनोद कदम, व्ही. व्ही. कुलकर्णी,निलेश महाजन, राहूल पाटील,उमाकांत हिरे व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित माहिती

आरती मंगळवारची

श्री स्वामी समर्थ आरती Swami Samarth 3 Aartis

श्री स्वामी समर्थ काकड आरती

श्री विष्णूंनी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सहावा अवतार घेतला, जाणून घ्या या खास दिवसामागील श्रद्धा

श्री स्वामी समर्थ स्तवन

ओसामा बिन लादेनचा फोटो, ISIS चा झेंडा ठेवण्याबद्दल हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

काँग्रेस सोडून राधिका खेडा आणि अभिनेता शेखर सुमन BJP मध्ये झाले सहभागी

19 वर्षानंतर सासरी आलेल्याला जावाईची केली हत्या, बहिणीने प्रेम विवाह केला म्हणून होता राग

मतदानानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित दादांच्या घरी

विश्व कल्याणासाठी महाशक्ती बनेल भारत, 2047 पर्यंत बनवायचे सुपरपॉवर- राजनाथ सिंह

पुढील लेख
Show comments