rashifal-2026

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर बदनामीकारक पोस्ट, महंत सुधीरदास विरोधात गुन्हा दाखल

Webdunia
गुरूवार, 6 मे 2021 (07:54 IST)
मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाल्यानंतर बदनामीकारक पोस्ट सोशल मीडियात महंत सुधीरदास यांनी पोस्ट केल्यामुळे त्यांच्याविरोधात पंचवटी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पोस्टवरुन  मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.
 
महंत सुधीरदास यांनी  मराठा क्रांती मोर्चाच्या पोस्टरवरील नेतृत्व करणा-या मुलीचा फोटो सोशल मीडियात पोस्ट करत ‘ती सध्या काय करते ?’ अशा शब्दांत सोशल मीडियात पोस्ट व्हायरल केली होती. त्यामुळे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यानंतर या प्रकरणात करण पंढरीनात गायकर यांनी तक्रार केली. त्यानंतर पंचवटी पोलीस स्थानकात  आयपीसी कलम ५०४ अंतर्गत बदनामीकारक पोस्ट आणि शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

अखेर माणिकराव कोकाटेंनी सोपवला राजीनामा

LIVE: माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला

वर्गमित्र गणवेशाची खिल्ली उडवायचे; चौथी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या

प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे निधन

Best Hatchback Cars in India 2025: २०२५ मध्ये या परवडणाऱ्या कारने लोकप्रियता मिळवली, सामान्य माणूस आणि उच्चभ्रू दोघांमध्येही त्या लोकप्रिय झाल्या

पुढील लेख
Show comments