Festival Posters

EWS आरक्षणाचा मराठा आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही

Webdunia
गुरूवार, 24 डिसेंबर 2020 (16:19 IST)
EWS आरक्षणाचा मराठा आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केली आहे. EWS आरक्षणाला माझा विरोध नाही, पण याचा धोका SEBC ला होणार नाही, याची हमी सरकार घेणार का? असा सवाल खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला केलेला असतानाच त्यावर सरकारकडून मोठी प्रतिक्रिया आली आहे. 
 
प्रसारमाध्यमांशाी संवाद साधताना अनिल परब यांनी मराठा आरक्षणावरील सरकारची भूमिका स्पष्ट केली. मराठा संघटनात वेगवेगळे मतप्रवाह दिसत आहेत. या संघटनांनी एकत्र येवून निर्णय द्यायला हवा. EWS च्या मागणीसाठी काही विद्यार्थी कोर्टात जातायत व त्यांना ते द्यावं लागतंय. हा काही एका जातीपुरता निर्णय नाही, तर गरीब घटकांसाठीचा निर्णय आहे. याचा मराठा आरक्षणावर फरक पड़त नाही, असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रात सागरी मासेमारीवर बंदी

हिंगोलीमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने गर्भातच एका बाळाचा मृत्यू

दापोडीमध्ये एकाच दिवशी पाच जणांचा संशयास्पद मृत्यू

अक्कलकोट तालुक्यात महिलेने आपल्या दोन वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली

सावत्र आई आणि मुलाच्या प्रेमप्रकरणाचा दुःखद शेवट; अंबाजोगाईमध्ये एक लाजिरवाणी घटना

पुढील लेख
Show comments