Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठा आरक्षण: मुदतीत आरक्षण द्या अन्यथा आंदोलन- मनोज जरांगे

Webdunia
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2023 (08:30 IST)
मराठा आरक्षण: मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. सरकारला दिलेल्या मुदतीत त्यांनी आम्हाला आरक्षण द्यावे अन्यथा पुन्हा आंदोलनाची भूमिका घेणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. तसेच विदर्भातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र दिले. मग आम्हीच काय केले. आम्हाला गायकवाड आयोगाने मागास असल्याचे सिद्ध केले आहे. जर पुरावे सापडले नाहीत तर मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही का, असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला आहे.
 
सरकारकडून आतापर्यत जी माहिती मिळाली, त्याचा आढावा समाजापुढे मांडण्यासाठी आणि समाजाला शांततेचे आवाहन करण्यासाठी 30 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबरपर्यत दौरा करणार आहे. या दौ-याची सुरुवात 30 सप्टेंबर  रोजी अंतरवाली सराटीपासून होणार आहे. सुरवातीला जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड जिल्ह्यांतील विविध गावांत दौरा करणार आहे. त्यानंतर धाराशिव, नगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतील विविध गावात दौरा केला जाणार आहे. तसेच 11 ऑक्टोबरला अंतरवली सराटीला या दौ-याची सांगता होईल. त्यानंतर 14 ऑक्टोबर रोजी जाहीर सभा घेतली जाणार आहे. या सभेत सरकारला ताकद दाखवून दिली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Edited By - Ratnadeep ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

सर्व पहा

नवीन

प्रिंसिपल कडून 6 वर्षाच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करत निर्घृण खून

कारमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह सापडले

29 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे मेट्रोचे उद्घाटन

पुण्यात अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने पतीचा निर्घृण खून

उल्हासनगरहून पॉर्न स्टार रिया बर्डेला अटक, कोण आहे रिया बर्डे, पोलिसांनी केले उघड

पुढील लेख
Show comments