Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात पुन्हा हिंसाचार, अज्ञातांनी एसटी बस पेटवली

Webdunia
सोमवार, 26 फेब्रुवारी 2024 (12:44 IST)
social media
महाराष्ट्रात आरक्षणाची आग थांबत नाहीये. हिंसाचाराची आग पुन्हा एकदा पेटली आहे. अंबड तालुक्यातील तीर्थपुरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा आंदोलकांनी महाराष्ट्रा राज्य परिवहन मंडळची बस पेटवून दिली. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. जालन्यातील बससेवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. 
 
 वृत्तसंस्थेनुसार, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) ने सांगितले की, 'महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पुढील सूचना मिळेपर्यंत जालन्यात त्यांच्या बसेस थांबवल्या आहेत. मराठा आंदोलकांनी बस जाळल्याची तक्रार एमएसआरटीसीच्या अंबड आगार व्यवस्थापकाने स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.'
 
फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्र विधानसभेत  मांडण्यात आलेले मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. 50 टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा मराठ्यांना 10 टक्के आरक्षण देण्याचे उद्दिष्ट होते. त्यानंतर 20 फेब्रुवारी रोजी मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेत कोटा विधेयक मंजूर होऊनही उपोषण मागे घेण्यास नकार दिला आणि पुन्हा उपोषणाला बसले. 
मागण्या मान्य होऊनही आंदोलन सुरूच ठेवण्याची गरज काय, असा सवाल भाजप नेते अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

पुढील लेख
Show comments