Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोपर्डीतील नराधमांना जाहीर फाशी द्या - उदयनराजे भोसले

Webdunia
शनिवार, 24 सप्टेंबर 2016 (17:54 IST)
कोपर्डीतील बलात्काराची घटना छत्रपती शिवाजी यांच्या स्वराज्याला काळीमा फासणारी आहे. ‘त्या’नराधमांना जाहीरपणे फाशी द्या. अशा नराधमांना लोकांसमोर गोळ्या घालायला हव्या अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी आपले सडेतोड मत माध्यमाशी बोलतांना व्यक्त केले आहे.  मराठा मूक मोर्चासाठी ते नाशिकमध्ये आले होते.

मराठा समाज कोणाच्या विरोधात का असले असे बिल्कुल नाही मात्र अट्रोसिटीवर चर्चा झाली पाहिजे आणि योग्य ते पाऊलत या प्रश्नाकरिता अधिवेशन बोलावले पाहिजे असे मत भोसले यांनी व्यक्त केले आहे.

बलात्काऱ्यांना गोळ्या घाला
कोपर्डी बलात्कारातील गुन्हेगारांना जाहीर फाशी द्या याला हवी , तर  त्यांना लोकांसमोर गोळ्या घालून ठार मारा, असा घणाघात उदयनराजेंनी केला आहे.
या प्रकरणात एक उदाहरण सरकारने ठेवले पाहिजे आणि जलदगती न्यायलयात हे प्रकरण नेऊन न्याय देणे देशाच्या हिताचं आहे. न्याय मिळत नसल्याने लोकांचा सरकारांवरचा,  पोलिसांवरचा विश्वास उडाला आहे, असं उदयनराजे म्हणाले.
सामाजिक समतोलासाठी कायद्यात बदल करा
सामाजिक समतोल टिकायचा असेल तर कायद्यात बदल करा, अशी मागणी यावेळी उदयनराजेंनी केली. मराठ्यांनी मूकमोर्चे काढले आहेत. परिस्थिति बिघडली तर उद्रेक होईल. लीबिया, सीरिया सारखी परिस्थिति होऊ देऊ नका. पक्षपेक्षा देशाचा विचार करा, असा सल्ला त्यांनी दिला.
जात नाही जगण्याची संस्कृती   मराठा                  
मराठा ही जात नाही जीवन जगण्याची संस्कृती आहे. स्पर्धेच्या युगात फक्त मेरिट हाच निकष असला पाहिजे. मराठा सोडून सर्वांना आरक्षण देतात. कुठल्याही जातीचा असो, आर्थिकदृष्टया गरीब असेल त्याला आरक्षण द्या. स्पर्धेच्या युगात आरक्षणामुळे प्रगती खुंटली आहे, असं उदयनराजे म्हणाले.
आरक्षण असल्याने भारतातले संशोधक अमेरिकेत गेले.  राज्यकर्त्यांनी जाती तयार केल्या.नेते अभिनेत्यांपेक्षा जास्त चांगला अभिनय करतात. सर्वाधिक कर्जांची परतफेड शेतकरी करतात, उद्योगपती कर्ज बुडवतात, अशा अनेक विषयांना उदयनराजेंनी हात घातला.
आधी या देशात राजे होते ते राजेच बरे होते तेव्हा तर क्य्डे सुद्धा नव्हते त्यामुळे कायद्यात बदल झालच पाहिजे. तर प्रत्येकाला समानतेचा हक्क दिला असुन जस संविधान म्हणते तो हक्क आम्हाला मिळाला पाहिजे असे मत भोसले यांनी व्यक्त केले.
उदयनराजेंच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे
*पैशांचा गैरवापर करुन न्याययंत्रणा आणि पोलिस यंत्रणांना ताब्यात घेऊन चेष्टा केली जात आहे.
*स्पर्धेच्या युगात फक्त मेरिट हाच निकष असला पाहिजे.
*मेक इंडिया नाही ब्रेक इंडिया होतंय.
*कायदा नव्हता तेव्हाही लोक जगत होते.
*आरक्षण दिलं नाही तर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत धड़ा शिकवा…
*अन्यथा सरकार एकटे नाही 288 आमदार जबाबदार
*मराठ्यांना न्याय मिळाला नाही तर प्रसंगी नक्षलवाद्यांच नेतृत्व करेन.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments