Dharma Sangrah

Durga Devi Aarti श्री दुर्गा देवीची आरती

Webdunia
बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (13:11 IST)
Durga Devi Aarti श्री दुर्गा देवीची आरती
दुर्गे दुर्गटभारी तुजविण संसारी
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी
वारी वारी जन्म मरणांतें वारी
हारी पडलो आता संकट निवारी
जय देवी जय देवी महिषासुरमथिनी
सुरवर ईश्वरदे तारक संजीवनी
जय देवी जय देवी
 
त्रिभुवनी भुवनी पाहता तुज ऐसे नाही
चारी श्रमले परंतु न बोलवे काही
साही विवाद करता पडले प्रवाही
ते तू भक्तांलागी पावसि लवलाही
जय देवी जय देवी
जय देवी जय देवी महिषासुरमथिनी
सुरवर ईश्वरदे तारक संजीवनी
जय देवी जय देवी
 
प्रसन्नवदने प्रसन्न होशी निजदासा
क्लेशापासुन सोडवी तोडी भवपाशा
अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा
जय देवी जय देवी
जय देवी जय देवी महिषासुरमथिनी
सुरवर ईश्वरदे तारक संजीवनी
जय देवी जय देवी

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

श्री हनुमान चालीसा Hanuman Chalisa

शनिवारची आरती

Sati Baijabai Yatra 2026 श्री गजानन महाराजांच्या परम् भक्त संत बायजाबाई यांच्या विषयी संपूर्ण माहिती

शुक्रवारी आंबट पदार्थ का खाऊ नयेत? देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी या दिवशी उपवास करण्याचे फायदे जाणून घ्या

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

पुढील लेख
Show comments