Webdunia - Bharat's app for daily news and videos
Install App
✕
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
ज्योतिष
लाईफस्टाईल
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
गणपती आरती संग्रह भाग 4
Webdunia
विघ्नांत विघ्नेशा हे गजानना ।
आरती मी करितों तुज पुरवि कामना ॥ धृ. ॥
भाद्रपदी शुद्ध चतुर्थीस तव बरी।
मूर्ति करुनि सर्व लोक पूजिती घरी॥
महिमा तव वर्णवे न पापगिरि हरी॥ येई ॥
घाई पाहीं करुनि त्वरा। विघ्नहरा। दे सुगिरा। हे कृपाधना ॥ विघ्ना. ॥ १ ॥
संकटि जे पडुनि प्रभो स्मरती तुजला ।
मुक्त करिसी जगती या खचित त्यांजला ॥
जाणुनि हे तव भजनीं ध्यास लागला ॥
गातो। नमितो। तारि आतां। या भक्ता। दयावंता। गौरिनंदना ॥ विघ्नां ॥ २ ॥
****************************
आरती शुभनंदनाची। पदनतजनानंदनाची॥धृ.॥
लंबोदरा दंतिवदना। यदीया मूर्ति कीर्तीसदना॥
सिंदुरानुलेपनु गहना। सुविलसदुंदुराख्यवहना॥चाल॥
शोभतीशूर्पकर्ण ज्याचे। मस्तकी अमंदवर मुख रसारसाप्रिंतप्रचुरतरसुदूर्वांकुरोर्धरुचिर रुचि जयाची॥
सुयोग रुचिर रुचि ॥आरती॥१॥
जयाते भालचंद्र म्हणती। कविगण कीर्ती सतत गाती॥
मुनिपदि हृदंबुजे ध्याती।अपरिचितहरिहरादि करिती॥चाल॥
सुतधन धान्यकलत्रादि। निस्थुल दयाल सुतगललं बिरक्त सुभमाल सुमदजलसंघमद लिकुलविमल चरितविभुची।
सुमंजुल विमलचरित विभुची॥ आरती.॥२॥
कटिताट पीतांबरधारी। सुरंजितचरण दिसति नुपुरी॥
मोदक मोदकासी धरी करी।सरिसृप बद्ध ज्याचे उदरी॥चाल॥
स्मरणें विघ्नवृंद वारी।तारि दुरितसागरी वसुदेवकरि परिवितार्थ अतिभक्ति गणपतीची॥
मंगला भक्ति गणपतीची॥आरती.॥३॥
****************************
ओंवाळू आर्ती देवा श्रीमंगलमूर्ती॥
अघसंकट नासुनियां द्यावी चरणांसी मुक्ती॥धॄ.॥जय॥
देवा तूं आद्य सुरवरवंद्या गणराया।
तुझीया स्वरुपी न सरी पावे दुसरी उपमाया॥१॥
शेंदूर अंगी चर्चुन कंठी मुक्तांची माळा।
लंबोदर उंदीरवर शोभे लल्लाटी टीळा॥२॥
पीतांबर परिधान पायी घुंगुरध्वनि गाजे।
दुर्वांकुर वाहिले आम्ही भक्तीचे काजे॥३॥
वार्षिक उत्साहाची सेवा यथाशक्ति केली।
न्यूनाधिक तें क्षमा करुनि रक्षी माउली॥४॥
महानैवेद्य घृतशर्करा्मिश्रीत हे लाडू।
अर्पू तुजला प्रसाद आपुल्या पात्री तो वाढूं॥५॥
पिता तुझा तो सांब सदाशिव ध्यातो।
श्रीरामा हनुमंतानें त्याचे पायी धरिला सुप्रेमा॥६॥
****************************
जय जय गणपती। ओवाळीत आरती।
साजि-या सरळ भुजा। परश कमळ शोभती॥धृ.॥
अवतार नाम भेद। गणा आदी अगाध॥
जयासी पार नाही। पुढे खुंटला वाद॥
एकचि दंत शोभे। मुख विक्राळ दोंद॥
ब्रह्मांडा माजि दावी।ऐसे अनंत छंद॥ जय.॥१॥
हे महा ठेंगणी हो। तुज नृत्यनायका॥
भोंवरी फ़ेरे देता। असुरा मर्दीले एका॥
घातले तोडर हो। भक्त जनपाळका॥जय॥२॥
सुंदर शोभला हो। रुपे लोपली तेजें।
उपमा काय देऊं। नसे आणिक दुजे॥
रवि शशि तारांगणे। जयामाजी सहजे॥
उधरी सामावली। जया ब्रह्मांडबीजे॥जय.॥३॥
वर्णिता शेष लीला। मूखे भागली त्याची॥
पांगुळले वेद कैसे। चारी राहिले मुके॥
अवतार जन्मला हो। लिंग नामिया मुखे॥
अमूर्त मूर्तिमंत। होय भक्तीच्या सूखे॥ जय॥४॥
ऐसाचि भाव देई। तया नाचतां पुढे॥
धूप दीप पंचारती। ओवाळीन निवाडे॥
राखें तूं शरणांगता।तुका खेळतां लाडे॥ जय॥५॥
****************************
पाश करि उत्पल शंख गदा। चक्रधान्याग्र ऋजा सुखदा॥
इक्षु धनु मातु लिंग सुसदा । हरी निजदंत कृतांतमंदा॥चाल॥
विराजे रत्नकलशशुंडा। दंड अतिप्रचंड, मंडित उदंड वरदित अखंड, किलब्रह्मांड मंडनाची॥ प्रभातंशंड खंडनाची॥१॥
आरती जगद्वंदनाची। उमाशिवसांबवंदनाची ॥धृ.॥
स्वयें जी भूषविणार जगा। वल्लभा दिव्यभव्यसुभगा॥
स्वहस्ती अमल- कमल विभगा। विहगगजवक्रहंस विहगा॥ चाल॥
भुजें परिरभणानुसरली। करुनि चपलता, परि न विकलता, तरुसि जशी लता वसंताची॥
सदा शीलता सुसंताची॥आर.॥२॥
प्रथम उत्पन्न विश्वकर्ता। प्रकृति रक्षूंना प्रलयिंहर्ता॥
गु्णगुण वेदशास्त्रपढता। सकलसिद्धयर्थ स्वार्थ्मर्ता॥चाल॥
असा विघ्नेश इश घ्यावा। अभय करणार, विभय भरणार, सुकवि तरणार, सदैवाची॥
कुमति हरणार राघवाची॥ आरती.॥३॥
****************************
आरती त्रिपुरमर्दनाची। वृषभध्वजा उमेशाची ॥ धृ. ॥
वामांकिनी उमा बैसे। सव्यवेष्ठित विघ्नेशें ॥
नंदी भृंगी उभे सरसे। पहाती विचित्रशावेशें ॥ चाल ॥
नेत्री पहा पहा शंभा, चंद्र्सूर्य नमिती रात्रिंचर चरण भद्रक्रर, असती शांतमूर्ति ज्याची। भॊळा वाणी असे साची ॥ १ ॥
वाणी देवि घरी वीणा। विधीकरि करताल निपुणा ॥
इंदिरा गान रचनपूर्णा। इंद्र पटू वेणुनाद करणा ॥ चाल ॥
धिमिधिमि मृदंगाचा। निशामुखी नाद सांद्र्पटु मंद हरि करींद्र सुंदरास्य ना केंद्र सर्व लक्षुनि सेविति, विधृति तांडवाची, शंभुला विधृती तांडवाची ॥ २ ॥
नंदी वाहन असें द्वारी। घेती दर्शन नरनारी ॥
नमितां त्रिविधताप सारी। सुरवर उमेश कामारी ॥ चाल ॥
बोरवेष्यिलासे गणे, बाण डमरूधर, भव्यगौरिहर, प्राशीजो जहर, शांती जो करि अमराची, नमितो तुजला गजाननजी ॥ ३ ॥
****************************
शंकरतनया भवभयहरणा पंचारती तुजला॥
करितों भावे विघ्नहरा हे तारी भक्तांला॥धृ.॥
प्रेमानंदे सर्व लोक स्मरती पदकमला॥
गिरिजांकी तू बैसूनि नाना दाखवसी लीला॥
अवतरलासी भक्तजनासी मुक्ती द्यायाला॥
विठ्ठसुत बलवत्वकवि ध्यातो भवाब्धि तरण्याला॥१॥
****************************
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
गणपती आरती संग्रह भाग 3
गणपती आरती संग्रह भाग 2
गणपती आरती संग्रह भाग 1
महालक्ष्मी आरती मराठी Mahalaxmi Aarti
Hartalika Aarti Marathi हरतालिका आरती मराठी
सर्व पहा
नवीन
टिटवाळा येथील महागणपती
आरती बुधवारची
इंदुकोटी तेजकिरण स्तोत्र
Akhuratha Sankashti Chaturthi 2024: अखुरथ संकष्टी चतुर्थी या दिवशी या मंत्राचा जप करा, जीवनातील सर्व संकटे दूर करा
श्री दत्तगुरुशरणाष्टकम्- दत्तात्रेया तव शरणं
सर्व पहा
नक्की वाचा
Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?
Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?
वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील
बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे
दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा
पुढील लेख
गणपती आरती संग्रह भाग 3