Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गणपती आरती संग्रह भाग 3

Webdunia
आरती गणपती। पदपंकजि प्रीती॥
ओवाळूं भावें भक्ती। सर्वारंभी मंगळमूर्ती॥धृ.॥
आधारे सृष्टी ज्याचें। तो हरिगौरीसुत नाम ज्याचे। होय विघ्नांचा अंत॥१॥
पाहतां रुप ज्याचें। अद् भूतचि गजमूख॥
शशांकसूर्य वन्ही॥ त्रिनेत्र दंत एक॥२॥ 
पन्नग विभूषणें। कटिकटि मंडीत॥
श्रवणी कंठ गळा। वेष्टितसे उपवित॥३॥
सायुध कर चारी। लंब उदर ज्याचे॥
भरले चौदाविधी। चौसष्टिकळी साचें॥४॥
सिद्धीऋद्धीबुद्धीचा भुक्तिमुक्तींचा दाता॥
बिरुदाचे तोंडर। पायी गर्जतीरमतां॥५॥
षडानन बंधूसंगे। नाचसि डमरु नादें॥
शिवशक्ती पाहोनियां ध्यान मनी। प्रेमभावे पुजीत॥
श्रीदास तुजलागी। करी तयासि मुक्त॥८॥
 
**************************** 
गजवदना मन नमले पाहुनियां तुजला।
म्हणतां मंगलमूर्ती संताप हरला॥
यास्तव निश्चय चरणी भाव तो धरिला।
व्यापुनि अवघे विश्व म्हणती तुज उरला॥१॥
जय देव जय देव जय संकटहर्ता।
तुजविण नाही कोणी संसारी त्राता॥धृ.॥
 
गिरिजांकी बैसुनियां स्तनपान करिसी।
तो तू राक्षस मोठमोठे निर्दळासी॥
उचलुनि शुंडाग्राने त्रैलोक्य धरिसी।
गिरीजारागें नित्य कां रें थरथरसी॥ जय.॥२॥
 
दास विनायक मूर्ती पाहुनिया डोले।
मंगलमूर्ती हृदयी राहो हें बाले॥
प्राणी जे गुण गाती ते जाणा तरले।
आपण तरुनी अपुले पूर्वज उद्धरिले॥जयदेव जयदेव ॥३॥
 
 
 
**************************** 
जय जय विघ्नविनाशन जय इश्वर वरदा।
सुरपति ब्रह्म परात्पर सच्चिंद्धन सुखदा॥
हरिहरविधिरुपातें धरुनिया स्वमुदा।
जगदुद्भवस्थितीप्रलया करिसी तूं शुभदा॥१॥
जय देव जय देव जय गणपति स्वामी, श्रीगणपती स्वामी, श्रीगणपती स्वामी।
एकारति निजभावें, पंचारति सदभावे करितो बालक मी॥धृ.॥
यदादिक भूतात्मक देवात्मक तूचि।
दैत्यात्मक लोकात्मविक सचराचर तूंची॥
सकलहि जिवेश्वरादि गजवदना तूंची।
तवविण न दिसे कांही मति हे ममसाची॥जय.॥२॥
अगणित सुखसागर हे चिन्मया गणराया।
बुद् धुदवत् जैअ तव पदि विवर्त हे माया॥
मृषाचि दिसतो भुजंग रज्जूवर वायां।
रजतमभ्रम शुक्तीवर व्यर्थचि गुरुराया॥ जय.॥३॥
अन्न प्राण मनोमय मतिमय हृषिकेषा।
सुखमय पंचम ऐसा सकलहि जडकोशां॥
साक्षी सच्चित् सुख तू अससि जगदीशा।
साक्षी शब्दही गाळुनि वससि अविनाशा॥जय.॥४॥
मृगजलवेत हे माया सर्वहि नसतांची।
सर्वहि साक्षी म्हणणे नसेचि मग तूचि।
उपाधिविरहित केवळ निर्गुणस्थिती साची।
तव पद वंदित मौनी दास अभेदेची॥जय देव.॥५॥
 
 
 
****************************
आवडी गंगाजळें देवा न्हाणीलें॥
भक्तीचें भूषण प्रेमसुगंधे अर्पीले॥
अहं हा धूप जाळू गणपतीपुढे॥
माझ्या मोरयापुढें॥
जंव जंव धूप जळे तवं तवं देवा आवडे॥१॥
पंचप्राणहीत धूपदीप जो केला॥
नैवेद्याकारणे उत्तम प्रकार अर्पिला॥
मध्वनाथस्वामी पंचोपचारि पूजीला॥
मग एकार्तीसी प्रेमे प्रारंभ केला॥२॥
 
****************************  
 
त्रिपुरासुर वधु जातां शिव तुजला चिती।
बळिबंधन कराया वामन करि विनंती॥
धाता सृष्टि सृजितां न चले मंदमती।
स्मरण करितां तुझे मग झाली स्फ़ूर्ती॥१॥
जय देव जय देव जयजी गणराया।
हरिहरब्रह्मादिक ते वंदिती तव पाया॥धृ.॥
धरणी धरित मस्तक शेषाला ओझें।
जाहालें तेव्हां स्मरण करि पै तुझे॥
हळुवट पुष्पप्राय घेले गणराजें॥
सुकीर्तीमहिमा घोषे भुवनप्रय गाजे॥ जय.॥२॥
महिषासुरासि वधिता पार्वतिही समरी।
विजया देही म्हणुनी प्रार्थी गौरी॥
गाती मुनिजन योगी सिद्धादिक सौरी।
तुझिया वरदे जिंकिती मन्मथ नरनारी॥जय॥३॥
पंडीत रामात्मज हा कवि किंकर तुझा।
विनवी तुजला भावें पावें निजकाजा॥
ऋद्धीसिद्धीदाता तो स्वामी माझा।
संकट हरुनि रक्षी भक्तांची लज्जा॥जय.॥४॥
 
**************************** 
उपेल जरती मदें शुंडा बहु साजे।
शेंदूर जो घवघवीत अद् भुत सुविराजे॥
घागरियांचा घोळ पदी घुळघुळ वाजे।
प्रसन्नवदना देवा ध्याना सुख माजे॥१॥
जय देव जय देव गजनरवेषा।
आरती ओवाळू तुजला विश्वेशा॥धृ.॥
विशेष महिमा तुजला नकळे गणनाथा।
हरिसी संकट विघ्ने तापत्रयव्यथा॥
अखंड आनंदें तूं डोलविसी माथा।
तांडव नृत्य करिती तातक् धिम ताथा॥जय.॥२॥
विद्या धन संपदा कनकाच्या राशी।
नारी सुत मंदिरे सर्वहि तूं देशी॥
निर्वाणी पावशी वेगी भक्तांशी।
गोसावीनंदन गातो कवितांशी॥जय.॥३॥
 
 
****************************  
वक्रतुंड एकदंत गौरिनंदना।
आरती मी करितों तुज हे गजानना॥धृ॥
 
पाशांकुशा शोभे करी दु:खभंजना।
रत्नजडित सिंहासन बुद्धिदीपना॥ सुरनरमुनि स्मरती तुला यतो दर्शना॥१॥
 
ऋद्धिसिद्धि करिती सद नृत्यगायना। देसि मुक्ति भक्तजनां हे दयाघना॥
विठ्ठलसुत लीन पदीं विघ्ननाशना। वक्रतुंड एकदंत॥२॥
 
****************************

संबंधित माहिती

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

Akshaya Tritiya Upay हे 3 चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील

आरती मंगळवारची

Akshaya Tritiya 2024 Daan अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 5 गोष्टींचे दान आयुष्यातील सर्व समस्या दूर करतील

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments