आधार चक्र नृत्य मांडिलें थोर ॥ टाळ श्रुती मृदंग वाजती गंभीर ॥ ब्रह्मा विष्णु आदि उभे शंकर ॥ निर्गुण ब्रह्म कवणा न कळेचि पार ॥१॥ जयदेव जयदेव जय (श्री) निर्विकल्पा ॥ आरति (भावार्थी) ओवाळूं निर्गुण निजरुपा ॥जयदेव ॥धृ०॥ नृत्य करितां शेष करी डळमळ ॥ कूर्म लपवी मान राहे निश्चळ ॥...