Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मार्च महिना आणि तुमचे भविष्य!

वेबदुनिया
गुरूवार, 3 मार्च 2011 (17:30 IST)
ND
मेष
आपल्या राशीचा स्वामी मंगळ आहे. प्रथम राशी असल्याने विचारांमध्ये उत्तेजना दिसून येते. या राशीच्या व्यक्ती अत्यंत उत्साही आणि कर्तव्यदक्ष असतात, कामाच्या प्रती जबाबदारीचे भान त्यांना असते.
मार्च 2011
फेब्रुवारी महिन्यात निर्माण झालेले कौटुबिक वाद या महिन्यात संपतील. एक नवीन काम हाती घ्याल. एकादी गोड बातमीही आपले जीवन बदलून टाकेल.या महिन्यात आर्थिक योग चांगले असल्याने आर्थिक प्रश्‍न मार्गी लागतील. नौकरी तसेच व्यापारात चांगला फायदा होईल. फिरण्‍याचे योग येतील, पण जरा जपून आणि काळजीने आखणी करा. दिनांक 10,18 शुभ व 14, 26 अशुभ आहे.

वृषभ
वृषभ ही रास चंद्राची अत्यंत आवडती रास आहे. या राशीच्या व्यक्ती अत्यंत तेजस्वी, बुद्धीमान असतात.
लोकांना आपलंसं करणारी ही रास असून, या व्यक्तींच्या जिभेवर मध असते असं म्हणतात. आपलं काम करताना कोणत्याही व्यक्तीला न दुखावण्याचा मानस या व्यक्तींचा असतो.
मार्च-2011
वृषभ राशीसाठी हा महिना सर्वार्थाने चांगला महिना आहे. अनेक रखडलेली कामं मार्गी लागतील. नौकरीत मनाप्रमाणे बदल होतील. कौटुंबिक आरोग्य चांगले राहिल. मनासारखे काम होईल. फक्त अधिकार्‍यांची मर्जी सांभाळा.

व्यापार, देण्‍या-घेण्याचे व्यवहार करताना सतर्क रहा.आपल्या विचारांना या महिन्यात कलाटणी मिळण्‍याची शक्यता आहे. आपण एखाद्याला दिलेला शब्द या महिन्यात पूर्ण होईल. दिनांक 15, 23 शुभ व 7,19 अशुभ.

मिथु न
या राशीचा स्वामी बुध आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्ती अत्यंत संयमी आणि सहकार्य करणार्‍या असतात. त्यांना‍ शिस्तीत जगणे आवडते.
मार्च-2011
उत्साह वाढवणारा महिना असेल. कार्यकुशलता वाढीस लागेल, घर, दुकानासंदर्भातील अडचणी सुटतील. नौकरीत प्रगती संभावते. नवीन काम करताना गणेश पूजनाने सुरुवात करा. विवाहादीक कार्यांसाठी हा महिना उत्तम असल्याने चांगले योग जुळून येतील. दिनांक 10,19 शुभ व 13,15 अशुभ.

कर्क
या राशीचा स्वामी चंद्र आहे. चंद्र नेहमीच आपली स्थीती बदलत असल्याने या राशीच्या व्यक्ती अत्यंत चंचल असतात.
मार्च-2011
दुसर्‍यांच्या वागण्‍याने मनस्ताप होण्याची शक्यता आहे. सतत अनिश्‍चिततेचे वातावरण असल्याने मनावर ताण येण्‍याची शक्यता आहे. प्रवास योग आहे. एखाद्या तिर्थक्षेत्राला भेट देण्‍याची इच्छा निर्माण होईल. कौटुबिक वाद टाळा. दिनांक 8, 17 शुभ व 15,19 अशुभ.

ND
सिंह
अगदी नावाप्रमाणे रास आहे. या राशीच्या व्यक्ती अत्यंत चिकाटीने काम करणार्‍या असतात. एखादे काम हातात घेतले तर ते पूर्ण केल्यावर स्वस्थ बसायचे अशी प्रवृत्ती या राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येते.
मार्च 2011
सतर्क न राहिल्याने या महिन्यात मोठा फटका बसण्‍याची शक्यता आहे. प्रयत्नांनंतर परिस्थिती नियंत्रणात येईल. पण कष्टाची तयारी ठेवा. महिन्याच्या मध्यात अनेक व्यापार योग असल्याने परिस्थिती पुन्हा सुधारेल. संधी आली तर सोडू नका. 6,19 शुभ व 14, 28 अशुभ. शिव आराधना करावी.

कन्य ा
या राशीच्या व्यक्ती अत्यंत शांत व संयमी असतात. संकोच त्यांच्या स्वभावातच असतो, मात्र योग्य जागी स्पष्ट मत व्यक्त करण्यासही या राशीच्या व्यक्ती धजावत नाहीत.
मार्च 2011
मनाला बेचैन करणारा महिना आहे. उत्साह मावळल्याने कामं रखडतील. आळशीपणा वाढेल. अनुभव आणि योग्य विचार करुनच निर्णय घ्या. परिस्थिती समजूनच पावलं उचला. दिनांक 11,23 शुभ व 15, 26 अशुभ.

तुळ
या राशीच्या व्यक्ती अत्यंत तर्कसंगत असतात. स्वच्छता, शिस्त यामुळे त्यांच्यात तेज असते. या राशीच्या व्यक्तींचा स्वभाव अत्यंत नम्र असतो.
मार्च-2011
उत्साह वाढेल. योग्यतेनुसार ज्ञानाचा वापर करण्‍याची संधी मिळेल. संधीचे सोने करण्‍याची तयारी असावी. दृष्टीकोण स्पष्‍ट ठेवा. जबाबदार्‍या वाढल्याने मानसिक संतूलन खराब होण्‍याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. दिनांक 6,17 शुभ व 7, 21 अशुभ.

वृ‍श्चिक
या राशीच्या व्यक्तींची खासीयत म्हणजे या राशींच्या व्यक्तींच्या स्वभावामुळेच त्यांना अधिक त्रास होत असतो. प्रामाणिकपणा, स्पष्टपणा,अशा स्वभावगुणांमुळे या राशीच्या व्यक्तींचे इतरांशी फारसे पटत नाही.
मार्च 2011
या महिन्यात आत्मविश्‍वास वाढेल. नवीन सहकारी भेटतील. जुन्या मित्रांची पुन्हा भेट झाल्याने मन प्रसन्न राहिल. अनेक जुन्या कटु आठवणी पुन्हा त्रास देण्‍याची शक्यता असल्याने वर्तमानाचा विचार करा. नौकरीत आणि व्यापारात उत्साह दिसून येईल. नौकरीत प्रमोशन होण्याची शक्यता आहे. दिनांक 3, 15 शुभ व 12, 19 अशुभ.

ND
धन ु
या राशीचा स्वामी गुरु आहे. ज्ञान, आदर, संमय या गुणांची प्राप्ती गुरुच्या माध्यमातूनच होत असल्याने या राशींच्या व्यक्तींमध्ये हा गुण दिसून येतो.
मार्च-2011
अत्यंत फलदायी असा हा महिना आहे. मानसिक आरोग्य सुधारेल. मन प्रसन्न रा‍हिल. साहस वाढेल. घाई-गडबडीने निर्णय घेऊ नका. आर्थिक फायदा मिळेल. करार किंवा कायदेविषयक बाबींमध्ये सतर्क रहा. राजकारणात प्रवेश करण्‍याचा विचार मनात घोळ घालेल, परंतु जरा विचार करुन निर्णय घ्या. साहित्यिकांसाठी हा महिना उत्तम आहे. दिनाक 8, 22 शुभ व 12, 24 अशुभ.

मकर
या राशीचा स्वामी शनी आहे. या राशीच्या व्यक्ती अत्यंत निराळ्या असतात. या राशींच्या व्यक्तींचा कामाचा मुख्‍य आधारच यांचा विचार असतो. अत्यंत सृजनशील असा स्वभाव असल्याने या व्यक्ती निर्णय घेण्यात सक्षम असतात. दिनाक 5, 15 शुभ व 6, 18 अशुभ.
मार्च 2011
मार्च महिन्यातही परिस्थिती फारशी सुधारताना दिसत नाही. यापूर्वीच्या महिन्याप्रमाणेच याही महिन्यात त्रास संभावतो. विरोधकांना प्रतिक्रीया देण्‍याचा मुळीच विचार करु नकात. नौकरी आणि व्यवसायात जरा सांभाळून वागा.

कुं भ
शनीप्रधान राशी आहे. साहस, स्पष्टवक्तेपणा, शिस्त हे या राशीतील व्यक्तींचे मुख्‍य गुण आहेत. क्रोध, स्वावलंबी असल्याने अनेकवेळा या राशींच्ये इतरांशी खटकते.
मार्च-2011
या महिन्यात चिडचिडेपणा वाढण्‍याची शक्यता अधिक आहे. कोणत्याही व्यक्तीच्या विश्वासावर निवांत बसून नका. विश्वासघात होण्याची शक्यता आहे. नौकरीत प्रगती. प्रमोशनची शक्यता. कोर्टाची कामं मार्गी लागतील. कौटुंबिक दृष्‍टीने चांगला महिना आहे. दिनांक 18, 29 शुभ व 10, 17 अशुभ.

मी न
या राशीचा स्वामी गुरु हा आहे. या राशीच्या व्यक्तींचा स्वभाव हा अत्यंत गंभीर, शांत, ‍सहिष्णू असा असतो. जबाबदारीचे भान असल्याने या व्यक्तींवर सोपवण्‍यात आलेली जबाबदारी ते योग्य पद्धतीने पार पाडतात.
मार्च 2011
स्वाभावातील चिडचिडेपणा वाढेल.छोट्या गोष्टींमध्ये वाद करणे टाळा.मतभेद दूर करण्‍याचा प्रयत्न करा. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. या महिन्यात अनेक आर्थिक व्यवहार करावे लागतील. दिनांक 13, 24 शुभ व 6, 18 अशुभ. गायत्री मंत्राचा जप करावा.

शनिवारची आरती

संकष्टी चतुर्थी : संकष्टी चतुर्थीला ही 9 कामे करू नये

शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

Shani Dev: शनिवारी या 5 शक्तिशाली मंत्राचा करा जप, शनिदेवांचा मिळेल आशीर्वाद

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Show comments